मध्य प्रदेशातील पूर्णा नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू - पुढारी

मध्य प्रदेशातील पूर्णा नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू

अमरावती ; पुढारी वृत्तसेवा : अमरावती येथून गायमुख लांबघाटी येथे पूजा अर्चना करण्यासाठी आलेल्या दोन तरुणांचा आंघोळ करताना पूर्णा नदीत बुडून मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील गायमुख येथे ही घटना गुरुवारी घडली. काल एका तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्याचवेळी दुसऱ्या तरुणाचा मृतदेह शोधण्यासाठी आज एनडीआरएफच्या पथकाने घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढला.

आज ज्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्याचे नाव नीलेश भास्करराव (वय २२, रा. अमरावती) असे आहे. तर शुक्रवारी अमरावती जिल्ह्यातील अशोकनगर येथील तरुणाचा मृतदेह उमर येथे बाहेर काढण्यात आला. भैंसदेही पीआय तरन्नुम खान यांनी सांगितले की, काल महाराष्ट्रातील अमरावती येथून सुमारे २५ लोक गायमुख पर्यटन स्थळावर पूजा अर्चना करण्यासाठी आले होते. यादरम्यान यातील दोन तरुण गायमुख येथील पूर्णा नदीत आंघोळीसाठी गेले होते, ते खोल पाण्यात गेल्याने बुडाले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिकांसह कुटुंबीयांसह मध्यप्रदेशातील पोलिसांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ टीमच्या मदतीने शोधमोहीम राबवली. शवविच्छेदन करून दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button