अमरावती : महिलेचा खून करून रखवालदाराची आत्महत्या | पुढारी

अमरावती : महिलेचा खून करून रखवालदाराची आत्महत्या

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : मोर्शी तालुक्यातील दापोरी शेतशिवारात रखवालदाराने महिलेचा खून करुन स्वतः विषप्राशन करून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना रविवारी (दि. 8) सकाळी उघडकीस आली.  राजू धुर्वे (वय ३५) असे आत्महत्या करणार्‍या रखवालदाराचे नाव आहे. राजू याने महिलेला शेती कामासाठी का आणले? त्यांच्यात कोणत्या कारणावर वाद झाला? याचा तपास पोलिस करीत आहेत.

संशयित मूळचा मध्‍य प्रदेशमधील

मोर्शीजवळ असलेल्या दापोरी येथील दामोदर विघे यांचे शेतात राजू धुर्वे रखवालदाराचे काम करत हाेता. ताे मूळचा मध्य प्रदेशमधील आठनेर तालुक्‍यातील कोलारी येथील रहिवासी होता.  पंधरा दिवसापूर्वी त्याने एका 30 वर्षीय महिलेसह तिच्या 3 वर्षीय मुलीला आपल्यासोबत काम करायला शेतात आणले. दोघांमध्ये  काही कारणावरून वाद झाला. राजूने महिलेच्या डोक्यावर लाकडी दांड्याने वार केल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. महिलेचा मृत्यू झाल्याचे पाहून राजुनेही सुद्धा विषारी औषधप्राशन केले. धुर्वे याचा उपचारापूर्वीच मृत्‍यू झाल्‍याचे डाॅक्‍टरांनी सांगितले.

हेही वाचा  

Back to top button