भंडारा : लाखांदूर जंगल परिसरात वाघाचा मुक्त संचार | पुढारी

भंडारा : लाखांदूर जंगल परिसरात वाघाचा मुक्त संचार

भंडारा, पुढारी वृत्‍तसेवा : भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर जंगल परिसरात पट्टेदार वाघ मुक्तसंचार करताना दिसला. वन विभागाने दिलेल्‍या माहितीनुसार, लाखांदूर वन विभागाच्या गस्ती पथकाला या पट्टेदार वाघ दिसला आहे. वाघ लाखांदूर तालुक्यातील अंतरागाव क्षेत्रातील नहराच्या पाळीवरून मुक्तसंचार करत होता.

सध्या लाखांदूर तसेच नजीकच्या वडसा परिसरातील नर भक्षी वाघ सिटी १ यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वन विभाग सतर्क झाले आहे. तर जंगल परिसरात गस्ती पथकाद्वारे देखरेख केली जात आहे. अशातच अंतरगाव, दांडेगाव, दहेगाव परिसरात मुक्त संचार करणारा हा पट्टेदार वाघ दिसून आल्‍याचे वन अधिकार्‍यांनी सांगितले.

हेही वाचा  

Back to top button