सावधान! आकोल्‍यात ‘मामा-भाचा डोह’ बनला मृत्‍यूचा सापळा ; प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष | पुढारी

सावधान! आकोल्‍यात 'मामा-भाचा डोह' बनला मृत्‍यूचा सापळा ; प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष

अकोला, पुढारी वत्तसेवा : तेल्हारा तालुक्यातील वारी येथील कुख्यात मामा-भाचा डोहाने एकाच आठवड्यात दुसरा बळी घेतला आहे. कित्येक दिवसापासून ह्या मामा भाच्याच्या डोहावर संरक्षण कंपाउंडची मागणी करण्यात येत आहे. मात्र अद्याप ही मागण पूर्ण झाली नाही. तर दुसरीकडे आतापर्यंत शेकडो जीव या डोहाने घेतले आहे, त्यामुळे अजून किती जीव जाण्याची वाट प्रशासन पाहत आहे, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

तेल्हारा तालुक्यातील वारी येथील कुख्यात मामा भाचा डोहात शनिवारी (दि.7) एक अनोळखी प्रेत तरंगताना दिसले. मृतकाने लाल रंगाचे कपडे घातलेले दिसत होते. वारीचे सरपंचानी हिवरखेड पोलिसांना याबाबत हिवरखेड पोलीसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

या व्यक्तीचा मृत्‍यु कोणत्‍या कारणामूळे झाला हे अद्याप समोर आले नाही. परंतु याच आठवड्यात सदर दोन दिवसांपूर्वीच अकोला येथील राज गुढधे नामक युवक सुद्धा याच डोहात बुडून मृत्यू पावला होता. आतापर्यंत शेकडो कुटुंबाचे चिराग या डोहात विझले आहेत. परंतु डोह बुजविण्याबाबत यंत्रणेने झोपेचे सोंग घेतले आहे, असा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे.

उपाययोजनांची बोंबाबोंब

गेल्या काही वर्षात वान फाउंडेशन व सामाजिक कार्यकर्त्यांनी हा डोह बुजविण्यात यावा अथवा त्याला संरक्षण भिंत देऊन तिथे कुणी जाऊ नये, अशी मागणी केली होती. यावर तत्कालीन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांनी पाहणी करून त्यावर काय उपाय योजना करता येतील यांचा अभ्यास केला होता. मात्र अद्याप त्यावर काहीही उपाय योजना झाल्या नाहीत. त्यामुळे वान फाउंडेशनचे भवानी प्रताप, उत्तम नळकांडे हे शासन दरबारी यांचा पाठपुरावा करीत आहेत.

हेही वाचा  

Back to top button