संपत्तीच्या वादातून मुलाने केली जन्मदात्या बापाची हत्या; कुऱ्हाडीने घातले घाव | पुढारी

संपत्तीच्या वादातून मुलाने केली जन्मदात्या बापाची हत्या; कुऱ्हाडीने घातले घाव

भंडारा, पुढारी वृत्‍तसेवा : फनोली येथे संपत्तीच्या वादातून मुलाने कुऱ्हाडीने वार करून वडिलांची हत्या केली. ही घटना गुरूवारी (दि. ५) मध्यरात्री घडली. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी आरोपीला तीन तासात बेडया ठोकल्‍या.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फनोली येथील शंकर महादेव कावळे (वय ६०) यांना दोन अपत्य आहेत. मोठा मुलगा श्रावण शंकर कावळे (वय ३६) व लहान दुर्योधन शंकर कावळे (वय ३५) अशी नावे आहेत. दुर्योधन कावळे व वडिल यांच्यात संपत्तीच्या वादातून नेहमीच वाद होत असत. गुरूवारी (दि.५) रात्री ८ च्या सुमारास त्यांच्यात भांडण झाले. त्यानंतर रात्री १२ च्या सुमारास अंगणात झोपलेले वडिल शंकर कावळे यांच्यावर दुर्योधन कुऱ्हाडीने हाडीने वार करून ठार केले आणि पळून गेला.

या घटनेची माहिती पोलिस पाटील यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. तर पोलिसांनी तीन पथक तयार करून आरोपीला तीन तासात नागपूर-भंडारा मार्गावरील मुजबी येथे बेडया ठोकल्‍या. श्रावण कावळे याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दुर्योधनविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पोलिस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा   

Back to top button