हिंजवडी : कासारसाईत बिबट्याची पुन्हा दहशत | पुढारी

हिंजवडी : कासारसाईत बिबट्याची पुन्हा दहशत

हिंजवडी : पुढारी वृत्तसेवा : कासारसाई (ता.मुळशी) येथे पुन्हा एकदा मादी बिबट्या आणि तिची तीन पिल्ले मागील पंधरा दिवसांपासून अनेक ग्रामस्थानी पहिली आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. येथील रावसाहेब शितोळे व निवृत्ती शितोळे यांच्या ऊसाच्या शेतात बिबट्या दिसत असल्याने परिसरात शेतकरी व ग्रामस्थ चिंतेत आहेत.

याबाबत बोलताना धनंजय शितोळे म्हणाले, ऊसाच्या मशागतीच्या कामास जाणाऱ्या शेतकऱ्यांना बिबट्या दिसत आहे मागील दोन दिवसात तीनदा ही मादी व तिची पिल्ले दिसल्याने शेतात जाताना भीती वाटत आहे.

अमरावती : शेतीच्या वाटणीवरून डोक्यात दगड घालून सावत्र आईचा खून

कारण आपल्या पिल्लांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने ही मादी शेतकऱ्यांवर देखीक प्राणघातक हल्ला करू शकत असल्याने धोका निर्माण होत आहे. युवा नेते सागर शितोळे म्हणाले,

माझे बंधू प्रवीण शितोळे यांनी शेतात काम करत असताना प्रत्यक्ष बिबट्या व त्यांच्या पिल्लांची हालचाल पाहिली आहे. सध्या ऊस उंच वाढलेला आहे. त्यामुळे लपून बसण्यासाठी अधिक सुरक्षित जागा बिबट्यासाठी उपलब्ध आहे.

Cannes : कान्समध्ये ‘हे’ तीन मराठी चित्रपट सहभागी होणार

दरम्यान सुमारे दोन महिन्यांपूर्वी नेरे परिसरात नवजात पिल्ले व मादी बिबट्या पाहण्यात आला होता. वनविभागाने केमेरे लावून पाहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी बिबट्याने ही पिल्ले उचलून नेल्याने शेतकर्यांनी सुटकेचा श्वास घेतला,

मात्र कासारसाई येथे पुन्हा तीन पिल्ले व मादी दिसत असल्याने ही तीच पिल्ले आणि बिबट्या असल्याची चर्चा येथे होत आहे. दरम्यान येथील वनाधिकारी मीरा केंद्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Back to top button