आदित्य ठाकरेंकडून १८५७ चा बोचरा प्रहार, फडणवीसांकडून आता 'मसिर्डीज बेबी' म्हणत पलटवार | पुढारी

आदित्य ठाकरेंकडून १८५७ चा बोचरा प्रहार, फडणवीसांकडून आता 'मसिर्डीज बेबी' म्हणत पलटवार

मुंबई, पुढारी ऑनलाईन : पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांना टोला लगावताना म्हटले होते की, “देवेंद्र फडणवीस हे १८५७ च्या उठावातही सहभागी होते.” त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना नव्या नावाने संबोधले. फडणवीस यांनी ‘मर्सिडिज बेबी’ असं नामकरण आदित्य ठाकरेंचं केलं आहे. त्यामुळे यावरही समाज माध्यमांवर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत.

नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी देवेंद्र फडणवीस बोलत होते. त्यांनी आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया विचारल्यानंतर फडणवीस म्हणाले की, “सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले आहेत त्यांना ना संघर्ष करावा लागला आहे, ना पाहिला आहे. त्यामुळे कारसेवकांच्या संघर्षाची थट्टा ते करु शकतात, पण कितीही खिल्ली उडवली तेव्हा तिथे होतो याचा आम्हाला गर्व आहे. मी हिंदू असल्याने मागील आणि पुढील जन्मावर माझा विश्वास आहे. त्यामुळे मागील जन्म असेल तर कदाचित १८५७ च्या युद्धात मी तात्या टोपे, झाशीच्या राणीसोबत लढत असेन. आणि तुम्ही असाल तर त्यावेळीही तुम्ही इंग्रजांसोबत युती केली असेल. कारण आता ज्यांच्याशी तुम्ही युती केली आहे ते १८५७ ला युद्धच मानत नाहीत”, असेही त्यांनी स्पष्टीकरण दिलं.

उद्धव ठाकरे आणि अमृता फडणवीस यांच्यात एक साम्य 

मुख्यमंत्र्यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर त्यावर प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझी पत्नी अमृता यांच्यात एक साम्य आहे . उद्धव ठाकरे टोमणे मारणे सोडत नाहीत आणि माझी बायको नको त्या गोष्टीला उत्तर देणं सोडत नाही. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून आपली पातळी वर ठेवली पाहिजे, आणि अशा काही गोष्टी आल्या तर माझ्या पत्नीनेही त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

हे वाचलंत का? 

Back to top button