पिंपरी : तरुणीच्या घरी जाऊन दिली पळवून नेण्याची धमकी | पुढारी

पिंपरी : तरुणीच्या घरी जाऊन दिली पळवून नेण्याची धमकी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : कॉलेजमध्ये पाठलाग करून तरुणीला लग्नाची मागणी घालत तिचा विनयभंग केला. त्यानंतर तरुणीच्या घरी जाऊन तिच्या घरच्यांसमोर तरुणीला पळवून नेण्याची धमकी दिली.

योगेश ऊर्फ सोन्या महाडिक (वय 25, रा. साने चौक, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या रोमिओ तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने शनिवारी (दि. 23) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

‘भोंग्याबाबत सरकार निर्णय घेऊ शकत नाही’

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या महावीर चौक, चिंचवड येथील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. आरोपी हा फिर्यादी यांच्या ओळखीचा आहे.

केएल राहुलवर घातली जाणार एका सामन्याची बंदी?

तो 18 एप्रिल रोजी दुपारी फिर्यादी यांच्या कॉलेजमध्ये आला. त्याने फिर्यादीला कॉलेजमधून बाहेर बोलावून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर फिर्यादीस लग्न करतेस का, असे विचारून तिचा विनयभंग केला.

जेल मुक्कामी राणा दाम्पत्याची आता एफआयआर रद्द करण्यासाठी धावाधाव !

शुक्रवारी रात्री पावणेनऊ वाजता आरोपी फिर्यादी यांच्या घरी गेला. त्या वेळी फिर्यादी यांचे काका घरी होते. ‘तुमच्या मुलीचे माझ्याशी लग्न लावून द्या, नाहीतर तिला मी पळवून घेऊन जाईन आणि तुम्हाला सगळ्यांना बघून घेईन,’ अशी आरोपीने फिर्यादी यांच्या काकाला धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Back to top button