चंद्रपूर : विधी महाविद्यालयासमोर जळालेल्या अवस्थेत आढळला मृतदेह | पुढारी

चंद्रपूर : विधी महाविद्यालयासमोर जळालेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर शहरातील तुकूम दुर्गापूर मार्गावरील विधी महाविद्यालयासमोर एका अज्ञात  व्यक्तीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.  व्यक्ती अंदाजे ५५ वर्ष वयोगटातील असून अद्‍याप ओळख पटलेली नाही.

चंद्रपूर शहरात तुकूम दुर्गापूर मार्गावर शांताराम पोटदुखे हे विधी महाविद्यालय आहे. या महाविद्यालयासमोर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह जळालेल्या स्थितीत आढळून आला. आज शनिवारी (२३ एप्रिल ) रोजी सकाळी मृतदेह काही नागरिकांना दिसून आल्याने एकच खळबळ उडाली. सदर मृतदेह अंदाजे ५५ वर्षे वयोगटातील आहे.

मृतदेह आढळून आल्यानंतर स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.अजून अज्ञात व्यक्तीची ओळख पटलेली नाही. खून करून पुरावे नष्‍ट करण्‍यासाठी मृतदेह जाळून टाकण्यात आला असावा, असा संशय पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button