सुधीर मुनगंटीवार : कोरोनाच्या ढालीमागे सरकारने विदर्भाचा निधी दिला नाही | पुढारी

सुधीर मुनगंटीवार : कोरोनाच्या ढालीमागे सरकारने विदर्भाचा निधी दिला नाही

वर्धा, पुढारी वृत्तसेवा : वर्ध्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवनिर्मित इमारतीची मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पाहणी केली. कोरोत्‍यावेळी ते बोलताना म्‍हणाले, काेराेनाच्या ढालीमागे सरकारने विदर्भाला निधी दिला नाही. तसेच विदर्भात अनेक गोष्टींचा निधी उपलब्ध ही होत नाही, असे विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीसाठी ४३ कोटी ११ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. ऑक्टोबर २०१९ पर्यंत इमारतीचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. या कामाला दोनदा मुदतवाढ देण्यात आली. कोरोनाचा कामावर परिणाम झाला तसेच कोरोनाच्या ढालीखाली सरकारने निधी अडविला. इमारतीतील फर्निचर दिखावू नव्हे तर टिकावू देखील असावे, असे मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
शासनाचा निधी योग्यरितीने खर्च झाला काय, याची माहिती घेतल्याचे मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. विकासकामे अधिकाधिक चांगली व्हावी, कामाचा दर्जा उत्तम राखण्याचा प्रयत्न केला. राज्याचे अर्थमंत्री असताना त्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, परिसरातील इमारतींच्या बांधकामाकरिता निधी मंजूर केला होता. त्या बांधकामाची पाहणी यावेळी करण्यात आली. वर्ध्यात सांस्कृतिक नाट्यगृह निर्माण करायचे काम अपूर्ण राहिले. जागेच्या प्रश्नाने तो प्रश्न सुटला नाही. भविष्यात संधी मिळाल्यास राज्यातील सर्वात सुंदर नाट्यगृह बनवू, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

यावेळी खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर आदींची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button