अमरावती : तहसीलदाराच्या बंगल्यात शिरले अस्वल  | पुढारी

अमरावती : तहसीलदाराच्या बंगल्यात शिरले अस्वल 

अमरावती, पुढारी वृत्तसेवा
उन्हाचा तडाखा वाढल्याने पर्यटन नगरीत वन्य प्राण्यांचे अस्तित्व सर्रास दिसून येत आहे. यावेळी चक्क तहसिलदाराच्या निवासस्थान परिसरात अस्वल फिरत असल्याचे दिसून आले. त्यामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे. यासाठी नागरिकांनी त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

उन्हाळ्यात पाण्याची कमतरता असल्याने पाण्याच्या शोधात जंगलातील प्राणी-पक्षी मानवी वस्तीत येत आहेत. तसेच आंबे आणि जांभळाचे शौकीन म्हणून ओळखले जाणारे अस्वल शहराच्या आसपास आढळून येत आहेत. त्यामुळे जंगली प्राण्यांप्रती नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सतर्क राहणे आवश्यक

आपल्या राहत्या घराजवळ अस्वलासारखा वन्य प्राणी पाहून मला आश्चर्य वाटले. ही घटना आपल्यासाठी आनंदाची बाब असली तरी, निवासी भागात वन्य प्राण्यांची हालचाल ही जीवघेणी ठरू शकते. त्यामुळे नागरी व वनविभागाने दक्ष राहणे गरजेचे आहे.
माया माने, तहसीलदार चिखलदरा

Back to top button