इलेक्ट्रिक गाड्या पेटू लागल्याने बॅटरी टेस्टींग आणि व्यवस्थापन नियम बदलणार

इलेक्ट्रिक गाड्या पेटू लागल्याने बॅटरी टेस्टींग आणि व्यवस्थापन नियम बदलणार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही महिन्यांपासून इलेक्ट्रिक गाड्यांना आग लागण्याचे प्रमाण वाढल्याच्या घटना दिसून येत आहे. या घटना पाहता सरकारकडून गाड्यांच्या टेस्टिंगशी संबंधीत काही नियम बनवण्यात येत आहेत. यामध्ये गाड्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या बॅटरी, बॅटरी मॅनेजमेंट आणि सेल या सर्व बाबींचा विचार करता नवे नियम आणत बदल करण्यात येत आहे. (EV Vehicle)

ज्या इलेक्ट्रिक गाड्यांच्या कंपन्यांच्या स्कूटर्संना आग लागली होती त्या कंपन्यांसोबत सरकार चर्चा करत आहे. गाड्यांना भविष्यात आग लागण्याच्या घटना थांबविण्यासाठी ओकिनावा, ओला, जितेंद्र आणि प्युअर इव्ही या कंपन्यांना ठोस पाऊल उचलण्याचे सुचविण्यात आले आहे. यासंबंधी सरकार लवकरच इव्ही मॅन्युफॅक्चरिंगच्या नियमांचे पालन करण्यासंबंधी आदेश देण्यात आले आहेत.

3 अठवड्यात 6 इलेक्ट्रिक गाड्यांना आग

तीन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत देशातील विविध भागांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याच्या किमान 6 घटनांची नोंद झाली आहे.

  • 9 एप्रिल रोजी नाशिकमध्ये शाह ग्रुपच्या जितेंद्र इलेक्ट्रिक व्हेइकल्सच्या 40 इलेक्ट्रिक स्कूटरला एका ट्रान्सपोर्ट कंटेनरमध्ये आग लागली.
  • 26 मार्च रोजी पुण्यातील धानोरी भागातील ओला इलेक्ट्रिकच्या S1 प्रो मॉडेलला आणि तमिळनाडूतील वेल्लोरमधील ओकिनावा येथील प्रेझ प्रो मॉडेलला आग लागली.
  • 28 मार्च रोजी तमिळनाडूतील त्रिची येथेही एक घटना घडली होती.
  • 29 मार्च रोजी चेन्नईमध्ये आणखी एक घटना नोंदवली गेली, जिथे Pure EV च्या इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागली.
  • ओकिनावाने 3,000 हून अधिक स्कूटर परत मागवले

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, NITI आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत म्हणाले होते की, मूळ उपकरण उत्पादकांनी (OEMs) अलीकडील अपघात झालेल्या मॅाडेल्स परत घ्याव्या असे सुचवण्यात आले आहे. त्यानंतर ओकिनावाने 16 एप्रिल रोजी आपल्या 3,000 हून अधिक स्कूटर परत मागवण्याचा निर्णय घेतला.

नितीन गडकरी यांनीही आगीच्या घटनेचा उल्लेख केला

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 31 मार्च रोजी लोकसभेत ईव्ही आगीच्या प्रकरणांवर बोलताना उच्च तापमानामुळे ही घटना घडली असावी, असे म्हटले होते. दरम्यान, या आगींमागचे कारण आम्ही शोधत आहोत, असेही त्यांनी सांगितले. यासाठी त्यांनी फॉरेन्सिक तपासणीचे आदेश दिले आहेत. आग लागल्याचे कारण शोधून सरकार पुढील कारवाई करेल, असे ते म्हणाले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news