नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपुरातील लकडगंड परिसरात आरा मशीनला लागलेल्या आगीत लाखो रूपये किंमतीचे लाकूड जळून खाक झाले आहे. आज सकाळी ही आग लागली. घटनास्थळी तातडीने अग्निशमन विभागाच्या चार गाड्या पोहचल्या. आरा मशीन असल्याने लाकडे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे आगीचा भडका उडाला. अशात कालही यवतमाळ, वाशिम व अकोला या तीन ठिकाणी आगी लागल्या होत्या. विदर्भातील आगीची कालपासूनची ही चौथी घटना आहे.
तसेच, ही आग लाकडाच्या वखारीला लागली आहे. अग्निशमन दल आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. या परिसरात लाकडाचे मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. शार्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामध्ये लाखों रुपयाचे फर्निचर जळून खाक झाले आहे. नागपूर महापालिकेचा फायर ब्रिगेट विभागाकडून ही आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्याठिकाणी ही आग लागली त्याच्या शेजारीच मोठ्या प्रमाणात लाकडे आहेत. त्यामुळे या आगीची व्याप्ती वाढली.
या परिसरात शंभरपेक्षा जास्त आरा मशीनचे काम चालते. या आगीचा आणखीन भडका होवू नये यासाठी फायर ब्रिगेडचे जवानानी प्रयत्न केले. तर हा आरा मशीनचा परिसर असल्याने आग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा