चंद्रपूर : नग्नावस्थेतील 'त्या' तरूणीच्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान, गँगरेपचा संशय | पुढारी

चंद्रपूर : नग्नावस्थेतील 'त्या' तरूणीच्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान, गँगरेपचा संशय

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा

भद्रावती येथे सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास सुमारे 25 वर्ष वयोच्या एका अनोळखी तरूणीचा शिरच्छेद केलेला मृतदेह ढोरवासा पिपरी मार्गालगत सरकारी आयटीआय समोरील शेतशिवारात आढळून आला होता. पण अद्याप त्या तरूणीच्या मृतदेहाची ओळख पाटविण्यात भद्रावती आणि चंद्रपूर पोलिसांना यश आले नाही. नग्नावस्थेतील मृतदेहाजवळ आढळून आलेल्या काही वस्तूंच्या माध्यमांतून पोलिसांनी ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र सदर तरूणीवर सामुहिक अत्याचार करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह या ठिकाणी आणून टाकरण्यात आला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

भद्रावती येथील ढोरवासा ते पिपरी मार्गावरील सरकारी आयटीआय जवळील शेतशिवारात 25 वर्ष वयाच्या तरूणीचा मृतदेह नग्नावस्थेत आढळून आला होता. शेतमालकाचा ही घटना निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात जावून याबाबत माहिती दिली होती. नग्न आणि मुंडके नसलेला मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला होता. त्यांनतर या घटनेचा तपास सुरू केला. मात्र अद्याप या तरूणीची ओळख पटलेली नाही. चंद्रपूर, भद्रावती आणि स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी कसून प्रयत्न सुरू केले आहे. भद्रावती पोलिसांनी तदर तरूणीची ओळख पटविण्यासाठी प्रेसनोट प्रसिद्ध केली आहे. त्याद्वारे तरूणीचे वर्णन आणि त्या मृतदेहाजवळ आढळून आलेल्या वस्तुंची माहिती दिली आहे.

सदर तरूणी ही वर्णाने गोरी होती. खांद्यापासून तर पायापर्यंत 138 सेंटीमीटर उंची, पाठीवर जंत डाग अशा बऱ्याच ओळखी सांगिततेल्या आहेत. तसेच त्या मृतदेहाजवळ जांभळ्या रंगाचा शूज आणि सोबतच पांढऱ्या धातूची खडा असलेली अंगठी, चावी व चार्जर आढळून आला आहे. या वर्णनावरून पोलिसांनी नागरिकांना आवाहन करून या घटनेत मदत मागितली आहे.

ज्या अवस्थेत मृतदेह आढळून आला त्यावरून अज्ञात आरोपीने धारधार हत्याराने क्रुरपणे तिची हत्या केली. तिचे धडापासून मुंडके वेगळे करून तिला जिवानीशी ठार केले. पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने मंडके कुठेतरी घेऊन गेला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

नग्नावस्थेत आढळून आलेल्या मृतदेहाच्या अवस्थेवरून त्या तरूणीसोबत सामुहिक अत्याचार करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी येथे शीर नसलेले धड आणून टाकण्यात आले असावा संशय व्यक्त केला जात आहे. तीन दिवसांचा कालावधी होऊनही पोलिसांना पुरावा मिळत नसल्याने आरोपींना शोधण्याचे तगडे आव्हान निर्माण झाले आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून भद्रावती आणि चंद्रपूर पोलिसांच्या दोन चमू घटनेचा छडा लावण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

कँडलमार्च काढून घटनेचा निषेध

तरुणीची निदर्यीपणे हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना शोधून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी भद्रावती येथील शेकडो महिलांनी महिलांनी केली. बुधवारी (6 एप्रिल) सायंकाळी सातच्या सुमारास शहरातील मुख्य मार्गाने कँडल मार्च काढून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. शिवाय आरोपींचा शोध लागला नाही तर मोठे आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी पोलिस प्रशासनाला दिला आहे. भद्रावती शहरातील नागमंदिरापासून महिलांनी त्या तरूणीच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करण्यासाठी कँडल मार्च काढला. शहरातील शेकडो महिला कँडल मार्च आंदोलनात सहभागी झाल्या. हातात कँडल घेऊन शहरातील मुख्य मार्गाने निघालेला कँडल मार्च भद्रावती शहराच्या स्व. बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वाराजवळ थांबला. नारी के सन्मान मे भद्रावती मैदान मे, नारी शक्ती जिंदाबाद अशा गगनभेदी घोषणांनी भद्रावती शहर दणाणून गेले होते. प्रवेशद्वाराजवळ त्या तरूणीला श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करीत असलेल्या सुनिता खंडाळकर, सामाजिक कार्यकर्ते विशा बोरकर, नागेंद्र चटपल्लीवार, शुभांगी बोरकुटे, संदीप जिवने, स्वाती चारी, तृप्ती हिरादेवे यांनी या घटनेबाबत आपल्या प्रतिक्रिया देताना आरोपी नराधमांच्या क्रूर कृत्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला.

यावेळी पोलिस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नराधम आरोपींचा तत्काळ शोध घेऊन फाशीची शिक्षा देण्यात यावी, तरूणीची ओळख पटविण्यात यावी, या गुन्ह्याचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालविण्यात यावा, तसेच या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात यावा अशा मागण्या आंदोलन महिलांनी केल्या.

 हे ही वाचा :

Back to top button