नागपूर : मृत्यूनंतरच्या जगाच्या आकर्षणातून बालिकेची आत्महत्या

भंडारा
भंडारा
Published on
Updated on

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : मृत्यूनंतर काय होत असेल, मृत्यूनंतरचं जग कसं असेल, याचं आकर्षण बऱ्याच जणांना वाटत असतं. मात्र, या आकर्षणातून अल्पवयीन मुलीने टोकाचं पाऊल उचलल्याचा प्रकार समोर आला. नागपुरातील एका १३ वर्षीय बलिकेने मृत्यूनंतरच्या जगाच्या आकर्षणातून आपल्या जीवनाची अखेर केली. 'आय लाईक डेथ' असं लिहून या मुलीने गळफास घेऊन तिने जीवनयात्रा संपवली. तिच्यावर नेमक्या कुठल्या विचारांचा प्रभाव झाला होता, याचा शोध आता पोलीस घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

या बालिकेचं वय तेरा वर्ष, मुलगी अभ्यासात हुशार, खासगी शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घ्यायची. मात्र तिच्या डोक्यात वेगवेगळ्या विचाराने घर करुन बसले होते. तिला मृत्यूनंतरच्या जगाचं आकर्षण वाढलं होतं. त्यामुळे ती आईचा मोबाईल घेऊन मृत्यूनंतरच्या दुनियेविषयी माहिती घेत होती.

इंटरनेटवर मिळालेल्या माहितीची नोट आपल्या वहीमध्ये टिपून ठेवायची. कोरोना यावा त्यातून मृत्यू व्हावा, आय लाईक डेथ, डोन्ट लाईक लाईफ, असे विचार तिने लिहून ठेवले होते. त्यामुळे कुठे तरी तिच्या मनात नकारात्मकता घर करत होती. ती लहान असल्याने त्याकडे कोणी लक्ष केंद्रित केलं नाही. मात्र, त्याचा परिणाम पुढे आला. सकाळी वडील ड्युटीवर गेले, भाऊ बाहेर गेला, आई घरात आपल्या कामात होती, त्याच वेळी तिने आपल्या खोलीत जाऊन गळफास घेतला आणि आपलं जीवन संपवलं. लहान मूल नेमकं काय पाहतात, काय वाचतात, याकडे लक्ष देण्याची गरज आहे, हे या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

हेही वाचलंत का ?  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news