चंद्रपुरात पुन्हा आढळले ३ सॅटेलाईट रॉकेटचे अवशेष | पुढारी

चंद्रपुरात पुन्हा आढळले ३ सॅटेलाईट रॉकेटचे अवशेष

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा चंद्रपूर जिल्ह्यात सिंदेवाही तालुक्यात 2 एप्रिल रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एक रिंग व व्हॉलीबालच्या आकाराचा गोळा या वस्तू आकाशातून कोसळल्‍या हात्‍या. या नंतर पुन्हा तीन सॅटेलाईचे अवशेष आढळून आले आहेत. यात आता व्हॉलीबालच्या आकाराचे गोलाकार वस्‍तूसह चार गोलाकार रिंग असे पाच अवशेष आढळून आले आहेत. या विषयी जिल्हाधिकारी अजय गुन्हाने यांनी इस्रोरोकडे याची चौकशी करण्याची विंनती केली आहे. येत्या दोन दिवसात एक्सपट्सची टीम सिंदेवाही येथे येऊन या घटनांची चौकशी करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आकाशातून आगीचे लोळघेत असलेली वस्तू सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी गावात कोसळली होती. त्यानंतर त्याच वेळी येथून 25 किमी अंतरावरील पवनपार गावालगत व्हॉलीबाल आकाराचा गोळा कोसळला होता. या दोन्ही वस्तू नागरिकांनी पोलिसांना माहिती देत पोलिस ठाण्यात जमा केल्या. त्यानंतर खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी, घटनास्थळी जावून पहाणी केली. तसेच त्या अवकाशीतय वस्तूंचेही निरीक्षण केले.

त्यांनी केलेल्या निरीक्षणानुसार न्युझीलंड देशाचे ब्लँक स्काय नावाचा उपग्रह सायंकाळी ६.१० वाजता सोडण्यात आलेला होता. ती वेळ आणि मार्ग पाहता हे त्याच रॉकेटचे तुकडे असावेत असा अंदाज प्रा. सुरेश चोपणे यांनी वर्तविला आहे. तसेच त्या अवकाशीय अवशेषावर इंग्रजीमध्ये लिहीलेले अक्षरे असल्याने ते न्युझीलंडच्या रॉकेटचे तुकडे असल्याचा संशय अधिक बळावत असल्याचे त्यांचे म्हणने आहे.
मात्र एक्सपर्ट चमूने या घटनेची चौकशी केल्यांनतर सत्यता समोर येणार असल्याचा विश्वास त्यांनी वर्तविला आहे. सध्यातरी वेगवेगळ्या अफवाच असल्याचे दिसून येत आहे, असे त्यांचे म्हणने आहे. शिवाय या परिसरात पुन्हा अवशेष कोसळण्याचा अंदाज त्यांनी वर्तविला होता. प्रशासनाला आवाहन करून अशा वस्‍तू शोधून काढण्याची विनंती केली होती. प्रशासनाला आज पुन्हा (सोमवार) पुन्हा तिन व्हॉलीबॉल आकाराचे अवशेष आढळून आले आहेत. सिंदेवाही लगतच्या आसोलामेंढा तलाव परिसर, मऱ्हेगाव आणि गुंजेवाही परिसरात असे तीन गोलाकार अवकाशीय अवशेष आढळून आले आहे. हे अवशेष सिंदेवाही पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत.

आज चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी इसरोकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांनी तक्रारीत या घटनेची चौकशीची विनंती केली आहे. सिंदेवाही तालुक्यात आढळून आलेल्या एकून पाच अवशेषांचा संदर्भ देऊन नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या घटनेची चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांचे म्हणने आहे. जिल्हाप्रशासनाल रविवारीच चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांनी या घटनांची चौकशी करण्याचे निर्देश् दिले होते. त्यांच्या निर्देशानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हे पाऊल उचलले आहे.

येत्या दोन दिवसात एक्सपर्टची चमू चंद्रपूर जिल्ह्यात येणार असल्याची माहिती आहे. हा चमू येऊन सिंदेवाही तालुक्यात जावून लाडबोरी, पवनपार, आसोलामेंढा, मऱ्हेगाव, गुंजेवाही परिसरात जावून निरीक्षण करणार आहे. त्यानंतर अवकाशातून आढळून आलेल्या या वस्तूंबाबत अधिकृत माहिती समोर येणार असल्याचे सुत्रांचे म्हणने आहे. पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतर इसरोकडे जिल्हाधिकारी यांनी, केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाची चौकशी होणार असल्याची आशा बळावली आहे.

Back to top button