लग्न एकाबरोबर अन् संसार दुसर्‍याबरोबर : विनायक मेटेंची शिवसेनेवर टीका | पुढारी

लग्न एकाबरोबर अन् संसार दुसर्‍याबरोबर : विनायक मेटेंची शिवसेनेवर टीका

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : लग्न एकासोबत आणि संसार दुसऱ्यासोबत करायचा, ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हती, अशी टीका शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक विनायक मेटे यांनी शिवसेनेवर नाव न घेता केली. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

विनायक मेटे म्हणाले की, गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांचे भाषण झाले. ते पूर्णपणे आघाडी सरकारचे लक्तरे काढणारे होते. राज्यातील सत्ता समीकरणावर भाष्य करणारी वस्तुस्थिती त्यांनी मांडली. काम करणाऱ्या माणसाला बाजूला ठेवण्याचे काम काही लोकांनी जाणीवपूर्वक केले, असेही मेटे म्हणाले. संसार दुसऱ्या सोबत केला. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. मात्र, काही लोकांनी ही संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न केला, अशी अप्रत्यक्ष टीका त्यांनी शिवसेनेवर केली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button