अमरावतीत ५ कोटींचे सोने जप्त : राजस्थानातील दोघांना अटक

अमरावतीत ५ कोटींचे सोने जप्त : राजस्थानातील दोघांना अटक

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : अमरावती शहरात हवालाचे मोठे घबाड राजापेठ पोलिसांच्या हाती लागले आहे. हवालाचे साडेतीन कोटी रुपये नगदी पकडल्यानंतर काही महिन्याच राजापेठ पोलिसांनी ५ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिणे जप्त केले. शहरातील दसरा मैदानासमोरील राधा कृष्णा अपार्टमेंट येथे राजापेठ पोलिसांनी शनिवारी रात्री १० हजार २३८.९०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ५ लाख ३९ हजार ८०० रुपयांची रोकड जप्त केली. शनिवारी रात्री ९ वाजल्यापासून रविवारी सकाळी ७ वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती.

पोलिसांनी राजस्थानच्या राजसमंध तालुक्यातील सेवाली येथील राजेंद्रसिंग भवरसिंग राव आणि उदयपूर वल्लभ नगरातील गिरीराज जगदिशचंद्र सोनी अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. प्रकृती बिघडल्‍याने एकास भिलवाडा जिल्ह्यातील गंगापूर येथे रुग्णालयात दाखल केले आहे.

दसरा मैदान परिसरातील राधाकृष्ण अपार्टमेंटमधील व्यक्तींकडे सोन्याचे दागिणे असल्याची माहिती राजापेठ पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनिष ठाकरे यांच्या नेतृत्वातील पथकाने सापळा रचून शनिवारी रात्री राधाकृष्ण अपार्टमेंटमधील फ्लॅटवर धाड टाकली. त्यावेळी तेथे राजेंद्रसिंग राव, गिरीराज सोनी आणि अशोक खंडेलवाल असे तिघे फ्लॅटमध्ये उपस्थित होते.
दरम्‍यान, त्यांच्याजवळ मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने आणि रोख असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी तिघांची कसून चौकशी केली. त्यांचा सोने विक्रीचा व्यवसाय असल्याचे आढळून आले. परंतु हा व्यवसाय असल्याबाबत त्यांच्याकडे योग्य ते दस्तावेज नव्हते. त्यामुळे तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पावतीशिवाय आणले दागिणे

तिघांचे अमरावती शहरातील सराफा व्यवसायिकांशी जवळीक केली होती. तसेच चार वर्षांपासून राजेंद्र सिंग राव अमरावतीत राहतात. मुंबई येथून ते चिट्ठी किंवा पावती शिवाय अमरावतीत दागिने आणत होते. शहरातील मोजक्या काही सराफा व्यावसायिकांना विक्री करायचे, असा पाेलिसांना संशय आहे.

आयकर विभाग करणार चौकशी

शनिवारी रात्री १० किलो सोने जप्त व रोख जप्त केल्याची माहिती राजापेठ पोलिसांनी आयकर विभागाच्या अधिकार्‍यांना दिली आहे. ही बेहिशोबी मालमत्ता असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सोमवारी आयकर विभागाचे अधिकारी याप्रकरणाची चौकशी करतील, असे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी सांगितले.

सर्व सोन्याच्या दागिने कॅमेरामध्ये मोजण्यात आले. पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह, पोलिस उपायुक्त विक्रम साळी, एसीपी भारत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात राजापेठचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनिष ठाकरे,  सुरेंद्र अहेरकर, पीएसआय कृष्णा मापारी, डिबीचे सागर सरदार, छोटेलाल यादव, निलेश गुल्हाने, दिनेश भिसे, विकास गुडधे, नरेश मोहरील, पवन घोम, दिनेश आखरे, वकील शेख, राजू लांजेवार, मंगेश शिंदे, सुनील विधाते, राजेश गुरेले, चालक निलेश पोकळे, सुनील ढवळे, महिला अमंलदार साधना इंगोले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news