Lemon Benefits : ‘लिंबू पाणी सेवनाचे फायदे ऐकून व्हालं थक्क’ | पुढारी

Lemon Benefits : 'लिंबू पाणी सेवनाचे फायदे ऐकून व्हालं थक्क'

पुढारी ऑनलाईन डेस्क:  फिट (Health Care) राहण्यासाठी काही लोक आहारामध्ये  लिंबू (Lemon) समावेश करतात.  लिंबू सेवन केल्याने आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. पाहूया,  लिंबू सेवनाचे फायदे नेमके काय आहेत. (Lemon Benefits)

Lemon Benefits : ‘लिंबु पाणी’ सेवनाचे फायदे

आकाराने छोट्या असलेल्या लिंबूमध्ये औषधी गुणधर्मांचा साठा बराच आहे. लिंबू सेवनाने आपली पचनक्रिया चांगल्याप्रकारे होते. त्वचा तजेलदार होते, वजन कमी होण्यास मदत होते, व्हिटॅमिन सी मिळते, प्रतिकारशक्ती वाढते असे बरेच फायदे लिंबू सेवनाचे आहेत.

  • त्वचेच्या तजेलदारपणासाठी

लिंबू पानी सेवन हे आपल्या त्वचेच्या फायद्याचे ठरते. रोज सकाळी लिंबू पाणी पिल्याने त्वचेवर तजेलदारपणा येतो. चेहऱ्यावरील डाग कमी होतात.

  • प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी

लिंबॅमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ‘सी’ असते. रोज सकाळी तुम्ही उपाशीपोटी लिंबू पानी सेवन केल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

  • वजन कमी करण्यासाठी 

तुम्हाला तुमचे वजन कमी करण्यासाठी लिंबूचे सेवन फायद्याचे ठरेल. कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून पिल्याने मेटाबॉलिझम (चयापचय) वेगवान हाेते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

  • कधी करावे लिंबू पाणी सेवन?

आपण लिंबाचा वापर आपल्या आहारात बऱ्याच प्रकारे करतो. उदा, लोंणचे, सरबत किंवा आमटीमध्ये वरून लिंबू रस पिळणे;  लिंबू पाण्याचा खऱ्या अर्थाने  फायदा करुन घ्यायचा असेल तर त्यासाठी  योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात त्‍याचे सेवन करणे गरजेचे आहे. कारण लिंबू पाणी चुकीच्या पद्धतीने घेतल्याने आपल्या शरीरास नुकसानदायीही ठरू शकते.  लिंबू पाणी रोज घ्यायचे असेल तर ते सकाळी उपाशीपोटी सेवन करणे अधिक फायद्‍याचे ठरते.

हेही वाचलंत का? 

Back to top button