अमरावती : खासगी बस नाल्यात पलटी, काही प्रवासी जखमी

अमरावती : खासगी बस नाल्यात पलटी, काही प्रवासी जखमी

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : अमरावती मोर्शीमार्गे मध्ये प्रदेशकडे खासगी बस जात होती. चालकाचे नियंत्रन सुटल्‍याने ही खासगी बस नाल्यात पलटली. यामध्ये काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही. सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

बसमध्ये ४० पेक्षा अधिक प्रवासी होते. सुदैवाने या अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, किरकोळ जखमी असलेल्या प्रवाशांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले. एसटी महामंडळच्या बस बंद आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अमरावती शहरात अवैधपणे खासगी वाहतूक सुरू आहे.

खासगी बस पूर्ण क्षमतेने भरली

पोलिसांच्या माहितीनुसार, आज सकाळी अकरा वाजताच्या सुमारास मध्य प्रदेशमधील होशगांबाद येथील एक खासगी बस अमरावतीमधून मोर्शीमार्गे मध्य प्रदेशमध्ये प्रवासी घेऊन जात होती. अशातच ही बस रोडच्या कडेला असलेल्या एका नाल्यात पलटी झाली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला, असा अंदाज आहे, असे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news