गडचिरोली : अहेरी येथे पोलिस शिपायाची गोळी झाडून आत्महत्या | पुढारी

गडचिरोली : अहेरी येथे पोलिस शिपायाची गोळी झाडून आत्महत्या

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : अहेरी येथील एका पोलीस शिपायाने त्याच्या निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता.२०) रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली. प्रमोद शेकोकर असे पोलीस शिपायाचे नाव असून ते प्राणहिता पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची आ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या निवासस्थानाची सुरक्षा करण्यासाठी नेमणूक करण्यात आली होती. त्यांची पत्नी ही ताडगाव पोलीस मदत केंद्रात कार्यरत आहे. काल रात्री त्यांनी अहेरी येथील पॉवरहाऊस कॉलनी मधील राहत्या घरी डोक्यावर गोळी झाडून आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरवाजा आतून बंद असल्याने दुसऱ्या घरातून पोलिसांनी आत प्रवेश केला. आत्महत्यचे कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र, कौटुंबिक कारणांमुळे त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी व्यक्त केला. प्रमोद शेकोकर हे बुलढाणा जिल्ह्यातील मूळ रहिवासी असल्याची माहिती आहे.

हेही वाचलतं का?

Back to top button