महामार्ग बांधणारे गडकरी स्वतःच्या घरासमोरचा रस्ता पुर्ण करण्यात अपयशी!

महामार्ग बांधणारे गडकरी स्वतःच्या घरासमोरचा रस्ता पुर्ण करण्यात अपयशी!
Published on
Updated on

नागपुर, पुढारी वृत्तसेवा : देशात हजारो किलोमीटरचे उत्कृष्ट महामार्ग बांधणारे मंत्री त्यांच्याच घरासमोरचा अवघ्या दोन किलोमीटर लांबीचा रस्ता बांधता बांधता थकले आहेत. संपूर्ण देशात 'रोडकरी' अशी ओळख असलेल्या केंद्रीय व रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी ही व्यथा व्यक्त केली आहे. गल्ली ते दिल्ली पर्यंत उत्कृष्ट महामार्ग बांधणारे आणि रस्ते बांधणीत जागतिक पातळीवर आपली किर्ती निर्माण करणारे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आपल्या घरासमोरच्या रस्त्याबद्दल असे बोलले आहेत.

संपूर्ण देशात 'रोडकरी' अशी ओळख असलेले नितीन गडकरी यांच्या या व्यथेला कारण ठरलं आहे, लोकांच्या सततच्या तक्रारींचा सूर, नागपुरात एबीपी माझाच्या विदर्भाच्या प्रतिनिधी सरिता कौशिक यांच्या "बेटर दॅन द ड्रीम अ पीपल्स स्टोरी" या पुस्तकच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना गडकरी यांनी मुंबई ते दिल्ली दरम्यान १ लाख कोटींच्या खर्चाचा ग्रीन हायवे जवळपास पूर्ण केल्याचे सांगितले. मात्र, एवढं महाकाय प्रकल्प पूर्ण करताना माझ्या घरासमोरचा अवघ्या दोन किमीचा रस्ता पूर्ण करू शकलो नाही असे गडकरी म्हणाले. अवघ्या दोन किमीचा रस्ता बांधताना लोकांच्या सततच्या तक्रारींमुळे गेले अनेक वर्ष घरासमोरचा रस्ता पूर्ण होऊ शकला नाही. आता मी थकलो आहे असे गडकरी म्हणाले.

लोकं किती तक्रारी करतात आणि न्यायालय ही त्यांच्यावर निर्णय देताना किती कालावधी लावतो याचा विचार होण्याची गरज असल्याचे गडकरी म्हणाले. आता एखादं पुस्तक या दिरंगाईबद्दलही तयार केलं पाहिजे आणि ते प्रत्येक न्यायाधीश आणि वकिलांना पाठवलं पाहिजे असे गडकरी म्हणाले. माझ्या घरसमोरचा रस्ता पूर्ण न झाल्यामुळे मी गेले सहा वर्ष माझ्या जन्मस्थान असलेल्या महालात राहत नाही, अशी खंत ही त्यांनी व्यक्त केली. आता महालातला तो रस्ता पूर्ण करू शकत नसल्यामुळे इतर दोन रस्त्यांचे बांधकाम सुरू करीत आहे असे गडकरी म्हणाले.

गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी बोलताना म्हटले होते की, प्रयागराजमध्ये हवाई उड्डाण करणारी बस धावणार आहे. त्याचा डीपीआर तयार केला जात आहे. दिल्लीहून प्रयागराजला सी-प्लेनमध्ये बसून येथील त्रिवेणी संगमावर उतरण्याची आपली इच्छा आहे, ही इच्छाही पूर्ण होणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्याआधी त्यांनी विमानंही उतरू शकतील असे २० रस्ते मी देशात बांधले असेही म्हटले होते.

हेही वाचलतं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news