यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : आर्णी तालुक्यातील खेडबीड शिवारात कापूस वेचणाऱ्या महिलेचा गुरुवारी दुपारी कुर्हाडीचे घाव घालून खून करण्यात आला. छबुबाई संतोष जाधव (४०) असे मृत महिलेचे नाव आहे. ती एकटीच कापूस वेचण्यासाठी आपल्या शेतात गेली होती. तिच्या मागून काही जण आले. त्यांनी छबूबाईच्या डोक्यावर कुर्हाडीने वार केले. यामुळे छबुबाई रक्ताच्या थारोळ्यात कपाशीच्या तासात पडून राहिली. काही वेळाने शेतात आलेले सासरे लक्ष्मण जाधव यांना छबुबाई रक्ताच्या थारोळ्यात आढळली.