नागपुरात १६०० कोटींचे नैसर्गिक आपत्ती प्रतिसाद केंद्र; वडेट्टीवार यांची माहिती | पुढारी

नागपुरात १६०० कोटींचे नैसर्गिक आपत्ती प्रतिसाद केंद्र; वडेट्टीवार यांची माहिती

नागपूर, पुढारी वृत्तसेवा: ‘नैसर्गिक आपत्ती ची पूर्वसूचना देणारे आणि आपत्तीत होणाऱ्या नुकसानीचे अचूक मापन करणारे अत्याधुनिक आपत्ती प्रतिसाद केंद्र नागपूर येथे उभारण्यात येणार आहे. नैसर्गिक आपत्ती मध्ये हे केंद्र उपयुक्त ठरेल.’

अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

अधिक वाचा:

१६०० कोटी रूपये खर्च करून मिहान येथे १० एकर जागेत हे आपत्ती प्रतिसाद केंद्र इजरायच्या तांत्रिक मदतीने बांधण्यात येणार आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ व राज्य सरकारच्या निधीतून यासाठी पैसा दिला जाईल.

येत्या सप्टेंबरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचे प्रयत्न आहे. दीड ते दोन वर्षात हे केंद्र बांधून तयार होईल, असे वडेट्टीवार म्हणाले.

अधिक वाचा:

वादळ, वारा, अतिवृष्टी, त्सुनामी, समुद्रातील वादळे आदी नैसर्गिक आपत्तींमुळे जीवित तसेच वित्त हानी होते. या केंद्रामुळे नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना मिळेल.

तसेच आपत्तीत झालेल्या नुकसानीचे अचूक मोजमाप होईल. त्यामुळे गरजूंना मदत मिळेल. संपूर्ण मध्यभारत हे कार्यक्षेत्र राहील, असेही वडेट्टीवार म्हणाले.

हेही वाचलेत का: 

पहा व्हिडिओ: नंदवाळमध्ये विठ्ठल कसे प्रकटले?

Back to top button