suicide : नागपुरात पती पत्नीसह दोन मुलांचे आढळले मृतदेह - पुढारी

suicide : नागपुरात पती पत्नीसह दोन मुलांचे आढळले मृतदेह

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : नागपुरातील दयानंद पार्क परिसरात खळबळजनक घटना घडली आहे. एका घरात पती-पत्नी आणि त्यांच्या दहा व चार वर्षाच्या मुलाचे मृतदेह आढळले आहेत ( suicide ). मंगळवारी (दि. १८) सायं. ७ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे.

सध्या घटनास्थळी पोलीस पोहोचले असून मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात येत आहे. पतीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. तर पत्नी व दोन्ही मुलांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले आहेत. त्यामुळे या घटनेतील गुढ वाढले आहे. तिघांची हत्या करून पतीने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. ( suicide )

पतीचा चायनीज खाद्य पदार्थांचा स्टॉल होता. कर्जबाजारी झाल्यामुळे त्याने असे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे.

 

Back to top button