अकोला : समाजकार्याच्या नावाखाली विवाहितेवर बलात्कार | पुढारी

अकोला : समाजकार्याच्या नावाखाली विवाहितेवर बलात्कार

अकोला; पुढारी वृत्तसेवा : शहरातील खदान परिसरातील एका 39 वर्षीय विवाहितेशी सामाजिक कार्याच्या ओळखीने घरात घुसून जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी खदान पोलिस स्टेशन येथे मारहाण, विनयभंग, खंडणी, बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून खदान पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

अकोला शहरातील खदान पोलिस स्टेशनला 39 वर्षीय विवाहित पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित महिलेची आरोपी राहुल श्रावण मस्के (रा. न्यू खेतान नगर) याच्याशी सामाजिक कार्यातून ओळख झाली. आरोपीने विविध सामाजिक विषयावर चर्चा करण्यासाठी पीडितेला मार्च 2021 मध्ये घरी बोलावून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला.

यादरम्यान पीडितेला ब्लॅकमेल करून वारंवार अत्याचार करणे सुरू ठेवले. यामध्ये नवऱ्याला सांगू नको म्हणून धमकावले तसेच 50 हजार रुपयांची मागणी सुद्धा केली. मात्र आरोपीचा अत्याचार दिवसेंदिवस वाढत असल्याने पीडितेच्या घरी जाऊन आरोपीने तिचा नवरा व तिला मारहाण केली.

याप्रकरणी पीडितेने खदान पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी राहुल श्रावण मस्के याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी खदान पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीरंग सनस यांच्या मार्गदर्शनात पोलिस आरोपीचा शोध घेत आहे.

 

Back to top button