Tukaram Mundhe | ‘अहो मुंढेसाहेब घेतलेली चढतच नाही!’, रात्रीचा येतो टोल फ्री नंबरवर फोन, तुकाराम मुंढे यांनी सांगितला किस्सा!

महाराराष्ट्रातील मद्य विक्री ही एफडीएच्या कार्यक्षेत्रात : लवकरच त्‍यामध्ये लक्ष घालणार असल्याचे स्पष्ट
Tukaram Mundhe
Tukaram Mundhe File Photo
Published on
Updated on

Tukaram Mundhe आपल्या बेधडक कारवाईंमुळे सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेले एफडीएचे प्रमुख आयपीएस तुकाराम मुंढे  यांचा धसका अनेक खाद्यपदार्थ विक्रेत्‍यांनी घेतला आहे. नियमांत न बसणाऱ्या व आरोग्यासाठी धोकादायक असलेल्या खाद्यपदार्थांच्या आस्थापनांवर कारवाईचा धडका सध्या सुरु आहे. महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासन विभाग प्रथमच एवढा सक्रीय झाल्याचे दिसत आहेत. तसेच एफडीए या विभागाअंतर्गत औषधे येताता तसेच महाराष्ट्रातील मद्यविक्रीही येत असल्याचे मुंडे यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे.

लवकरच मद्य ही रडारवर

एका मुलाखतील तुकाराम मुंढे  यांनी स्पष्ट केले की महाराराष्ट्रातील मद्य विक्री ही एफडीएच्या कार्यक्षेत्रात येत असून लवकरच त्‍यामुध्ये लक्ष घालणार असल्याचे त्‍यांनी स्पष्ट केले. आता त्‍यांनी स्पष्ट केले की मद्याच्या क्वालीटीकडेही लक्ष देणार आहे. कारण एफडीच्या हेल्पलाईन टोल फ्री नंबरवर अनेक मद्यप्रेमीचे रात्रीच्या वेळेस फोन येत असल्याचे त्‍यांनी स्पष्ट केले

साहेब घेतलेली चढतंच नाही

या कार्यक्रमात तुकाराम मुंढे यांनी एक किस्सा सांगितला, ते म्हणाले की जनतेला कोणत्‍याही भेसळयुक्त अन्ना बद्दल तक्रार करायची असेल तर एक हेल्पलाईन नंबर सुरु केला आहे. हा नंबर रात्रंदिवस सुरु असतो अनेक ग्राहक यावर फोन करुन तक्रारी करत असतात. यामध्ये आमच्या काही कर्मचाऱ्यांनी रात्रीची ड्युटी बदलून मागितली. याची अधिक चौकशी केली असता असे लक्षात आले की. रात्री च्या वेळी काही फोन येतात व आम्हाला मुंढे  साहेबांचा फोन नंबर द्या अशी विचारणा केली जाते. कर्मचारी नंबर देत नाही तक्रार सांगा म्हणता. तर पलिकडून सांगितले जात आम्ही अशा ठिकाणी बसलो ड्रिंक घेत आहे पण कितीही घेतली चढतंच नाही. यामुळे ते मद्य बनावट असल्याचे लक्षात येते.

Tukaram Mundhe
Tukaram Mundhe: ठाकरे, शिंदे की फडणवीस? कोणता मुख्यमंत्री भारी? तुकाराम मुंढेंना अडचणीत टाकणारा प्रश्न; उत्तरानं सगळेच अवाक्

गुणवत्तेत तडजोड खपवून घेणार नाही

यावर पुढे बोलतना मुंढे यांनी सांगितले की या तक्रारींवर आता कारवाई केली जाणार असून ते म्हणाले की 'खाद्यपदार्थांप्रमाणेच मद्य आणि मद्यार्क नसलेल्या पेयांमध्ये भेसळीच्या तक्रारी वाढल्या असून, गावठी दारूमध्ये विषारी रसायन मिसळल्याने मृत्यू झाल्याच्या घटना पुण्यात घडल्या आहेत. पेयजलांची गुणवत्ता, त्याचे उत्पादन आणि लेबलिंग यावर आमचे बारकाईने लक्ष आहे. दूध, पनीर, खाद्यतेलांप्रमाणेच 'अल्कोहोलिक' आणि 'नॉन अल्कोहोलिक' पेयांचीही तपासणी करणार असून, खानपानाच्या गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही,' असा खरमरीत इशारा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news