Rain Update | कोकण, मध्य महाराष्ट्रात मंगळवारपर्यंत वादळी पाऊस

मराठवाड्याच्या काही भागांत हलका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
Maharashtra Monsoon update
कोकण, मध्य महाराष्ट्रात मंगळवारपर्यंत वादळी पाऊस file photo
Published on
Updated on

पुणे : कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भ या भागात मंगळवारपर्यंत वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पाऊस होणार आहे. मराठवाड्याच्या काही भागांत हलका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Maharashtra Monsoon update
रामगिरी महाराजांच्या समर्थकांचा आज वैजापुरात जन आक्रोश मोर्चा

दरम्यान, हवामान विभागाने राज्याच्या काही भागांत 'यलो अलर्ट' दिला आहे. मध्य बांगला देश व लगतच्या भागावर असलेला कमी दाबाचा पट्टा आता उत्तर बांगला देशात सक्रिय आहे. तसेच कर्नाटक किनारपट्टीवरील पूर्व मध्य अरबी समुद्रापासून मालदीव भागापर्यंत असलेला कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी झाली आहे.

त्याचबरोबर आग्नेय अरबी समुद्र ते गुजरातपर्यंत हवेच्या वरच्या भागावर चक्रीय स्थिती असून, त्याचा प्रभाव वाढलेला आहे. या स्थितीमुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात वादळी वारे, विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस पडणार आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल.

Maharashtra Monsoon update
रोनाल्डोची YouTube वर एंट्री, ९० मिनिटांत १० लाख सबस्क्रायबर्स

कुठे आहे 'यलो अलर्ट'

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर,

छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news