रोनाल्डोची YouTube वर एंट्री, ९० मिनिटांत १० लाख सबस्क्रायबर्स

Cristiano Ronaldo : काय आहे रोनाल्डोच्या पहिल्या व्हिडिओत?
Cristiano Ronaldo on You Tube
दिग्गज फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने युट्यूबवर एंट्री केली आहे. Cristiano Ronaldo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क | Cristiano Ronaldo YouTube Channel Record : दिग्गज फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने युट्यूबवर एंट्री केली आहे. त्याने आपले काल (दि.21) यूट्यूबवर UR Cristiano हे चॅनल सुरू केले आहे. ही माहिती समजताच रोनाल्डोच्या चाहत्यांनी चॅनेल सबस्क्राईब करण्यासाठी युट्यूबवर धाव घेतली आणि अवघ्या ९० मिनिटांत १० लाख सबस्क्रायबर्स झाले. रोनाल्डोचे हे चॅनल सर्वात वेगाने युट्यूबवर सर्वाधिक सबस्क्रायबर्स असणारे चॅनल बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. हा रेकॉर्ड सध्या मिस्टर बीस्ट नावाच्या यूट्यूब चॅनलच्या नावावर आहे. त्याचे युट्यूबवर 311 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत.

काय आहे रोनाल्डोच्या पहिल्या व्हिडिओमध्ये?

ख्रिस्तियानो रोनाल्डोने त्याच्या पहिल्या YouTube व्हिडिओमध्ये फुटबॉलपासून बाहेरच्या जगात आपला दिवस कसा जातो? याची झलक दाखवली आहे. यामध्ये त्याने यूट्यूब चॅनेलबद्दल उत्साह व्यक्त केला आणि चाहत्यांशी अधिक चांगला समन्वय राखणे हा आपला उद्देश असल्याचे सांगितले. तो म्हणाला, "मी नेहमीच सोशल मीडियावर चाहत्यांसोबत बॉन्डिंगचा आनंद लुटला आहे. आता माझे YouTube चॅनल मला चाहत्यांशी अधिक चांगल्या पद्धतीने जोडण्यात मदत करेल."

रोनाल्डोचा यूट्यूब आणि डिजिटल विश्वातील प्रवेश हे एक धोरणात्मक पाऊल म्हणता येईल. त्याचे फॅन फॉलोइंग आश्चर्यकारक आहे आणि जगातील लाखो-करोडो त्याला फॉलो करतात. यूट्यूबच्या माध्यमातून तो त्याच्या फुटबॉल कारकिर्दीशी संबंधित आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित व्हिडिओ लोकांसोबत शेअर करताना आपल्याला दिसेल.

Cristiano Ronaldo on You Tube
बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या घरावर हल्ला

अवघ्या दोन तासांत 1 मिलियन सबस्क्रायबर्स आकडा केला पार

रोनाल्डोला फुटबॉलमधील दिग्गज खेळाडू मानला जातो. बुधवारी तो यूट्यूबवर येताच त्याच्या चॅनलवर चाहत्यांची झुंबड उडाली. रोनाल्डोच्या चॅनलने अवघ्या ९० मिनिटांत १० लाख सबस्क्रायबर्सचा आकडा ओलांडला. यावरून त्याच्या क्रेझचा अंदाज लावता येतो. यासह रोनाल्डोने विक्रमी वेळेत इतके सदस्य मिळवून इतिहास रचला आहे. आतापर्यंत त्याचे सुमारे १ कोटी २० लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स झाले आहेत.

रोनाल्डो सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू

UR Cristiano चॅनलवर 18 व्हिडिओ पोस्ट करण्यात आले आहेत. यामध्ये रोनाल्डो आणि त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्ज पर्सनल लाईफबद्दल बोलताना दिसत आहेत. रोनाल्डोने आत्तापर्यंत कारकिर्दीत 33 ट्रॉफी जिंकल्या आहेत. यात युरोपातील मानांकित UEFA चॅम्पियन्स लीग पाच वेळा जिंकली आहे. रोनाल्डो फुटबॉलमध्ये विक्रमी 897 गोल केले आहे, तर असिस्ट 253 केले आहेत. रोनाल्डोने त्याच्या कारकिर्दीत चौथ्यांदा फोर्ब्सच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान पटकावले होते. यासह, सौदी अरेबियाच्या संघ अल-नासरमध्ये सामील झाल्यानंतर, रोनाल्डो जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू बनला आहे. त्यांची एकूण कमाई सुमारे 260 मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 2 हजार कोटी रुपये आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news