मॉर्निंग वॉक करताना या गृहिणीला धक्का देत तिच्या गळ्यातील दागिने लंपास

file photo
file photo
Published on
Updated on

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : डोंबिवली-ठाकुर्ली-कल्याण असा मध्य रेल्वे मार्गाला जोडणारा 90 फुटी समांतर रस्ता पादचाऱ्यांसाठी विशेषतः गृहिणींसाठी असुरक्षित असल्याचे अनेक घटनांवरून स्पष्ट झाले आहे. अशीच एक घटना एका वृद्ध गृहिणीच्या बाबतीत घडली आहे. मॉर्निंग वॉक करताना या गृहिणीला धक्का देत तिच्या गळ्यातील मंगळसूत्र व चेन खेचून दोघा चोरट्यांनी धूम स्टाईलने पळ काढला.

हा सर्व घटनाक्रम सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या प्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात 90 फुटी रोडला असलेल्या कांचन गावातील विठ्ठल प्लाझा फेज 2 मध्ये राहणाऱ्या सुनीता केरबा पाटील (62) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या वृद्धेच्या गळ्यातील 48 हजार रुपये किंमतीचे 20.440 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र आणि 13 हजारांची 5 ग्रॅम वजनाची चेन असा 61 हजार रुपये किंमतीचा सोन्याचा ऐवज खेचून या चोरट्यांनी पळ काढला. ही घटना रविवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास घडली.

कल्याण-डोंबिवली शहरांना जोडणाऱ्या ठाकुर्ली समांतर रस्त्यावर सकाळी मॉर्निंग वॉकसाठी परिसरातील रहिवाश्यांची गर्दी असते. यात गृहिणींची संख्या लक्षणीय असते. या गृहिणी गळ्यात दागिने परिधान करूनही वॉकिंग करतात. हीच संधी चेन स्नॅचर्स साधत आहेत. रविवारी सकाळी सुनीता पाटील या रस्त्यावर मॉर्निंग वॉक करत होत्या. दुचाकीवर आलेले दोन तरूण त्यांच्या मागावर होते. याच दरम्यान एक तरुण दुचाकीवरून खाली उतरला. त्याने सुनीता यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व चेन हिसकावली. मात्र सुनीता यांनी ताकदीनिशी लुटारूंना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला. या बदमाश्यांनी सुनीता यांना ढकलले आणि दुचाकीवरून धूम ठोकली. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटिव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे.

काही दिवसांपूर्वी याच 90 फुटी रोडला असलेल्या बालाजी आंगन गृहसंकुलात राहणाऱ्या विजया सेलवी (38) यांचे एक लाख रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या लुटारूंनी मानेला हिसका देऊन चोरून नेले. मुलाला शाळेत सोडून परतणाऱ्या विजया यांच्याबाबतीत हा प्रक्रार घडला. या संदर्भात रामनगर पोलिसांनी विजया यांच्यातक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. या रस्त्याला वारंवार वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांच्या घटना घडत असतात. त्यामुळे या मार्गावर पोलिस गस्ती वाढविण्याची मागणी परिसरातील रहिवाश्यांसह व्यापारी-दुकानदारांकडून यांच्याकडून होत आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news