file photo
file photo

डोंबिवली : अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरूणीचा छळ

Published on

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : पश्चिम डोंबिवलीत राहणाऱ्या एका अल्पवयीन तरूणीशी इंस्टाग्रामच्या माध्यमातून छळ करण्यात आला. सुरूवातीला मैत्री, त्यानंतर व्हिडीओ कॉल, अश्लील स्क्रीनशॉट फोटो आणि त्यानंतर तेच फोटो सोशल मीडियातून व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. आरोपीला विष्णूनगर पोलिसांनी राजस्थानामधून अटक केली. सोहेल सलामदद्दीन खान (वय 18) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो राजस्थान राज्यातील चुरू जिल्ह्यातल्या तारानगरमध्ये आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, यातील पीडित तरुणीशी आरोपी सोहेल खान याने इंस्टाग्रामवर मैत्री केली होती. 1 जुलैपर्यंत ही मैत्री होती. तत्पूर्वीच्या दिवसांत या तरूणीला व्हिडीओ कॉल केले. या कॉलमध्ये सदर तरूणीच्या अश्लील फोटोचे स्क्रीनशॉट काढले. माझ्याशी बोलली नाहीस तर हेच अश्लील फोटो सोशल मिडीयावर प्रसारीत करेन, अश्या धमक्‍या दिल्‍या. हा प्रकार बऱ्याच दिवसांपासून सुरू होता. मात्र भीतीपोटी ही तरूणी कुणाला काही सांगत नव्हती. ब्लॅकमेलर या तरूणीला सतत धमक्या देत होता. अखेर सातत्याने दिल्या जाणाऱ्या धमक्यांना घाबरून भयभीत झालेल्या तरूणीने हा प्रकार घरच्यांना सांगितला.

या तरूणाला धडा शिकविण्यासाठी घरच्यांच्या मदतीने तरूणीने पोलिस ठाणे गाठले आणि तेथील पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तपासादरम्यान अनोळखी आरोपीचे नाव व पत्ता निष्पन्न नव्हता. मात्र या तरूणीकडे आरोपीचा मोबाईल नंबर होता. या नंबरच्या माध्यमातून सायबर क्राईमच्या मार्फत माहिती काढली. त्यानंतर आरोपीचे नाव व पत्ता निष्पन्न झाला. या पोलिसांनी राजस्थानमध्ये जाऊन सोहेल खान याला बेड्या ठोकल्या. कल्याण कोर्टाने त्याला अधिक चौकशीकरिता पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी मैत्री केल्याने फसगत होण्याची शक्यता असते. त्यामुळे सोशल मीडिया वा अन्य कोणत्याही स्वरूपाच्या माध्यमातून मैत्री करणाऱ्यांना युवा-युवतींनी प्रतिसाद देऊ नये. तसेच फोटो, व्हिडिओ वा आर्थिक व्यवहार देखिल करू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news