

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : कल्याण ग्रामीणमधील सोनारपाडा येथील भूमिपुत्र शेतकरी कित्येक वर्षांपासून कसत असलेली जमीन परस्पर अनियमित बिल्डरच्या नावावर करण्याचा घाट सुरू आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी न्याय मागितला मात्र त्यांना न्याय मिळत नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला.
यासंदर्भातील भूमिपुत्र शेतकरी यांनी गुरुवारी (दि. १२) कल्याण तहसीलदार जयराज देशमुख यांची भेट घेऊन शेतकऱ्यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची माहिती दिली. यावेळी तहसीलदार यांनी शेतकऱ्यांची बाजू जाणून घेत यासंदर्भात कायदेशीर मार्गांचा अवलंब करून मागण्यांचा विचार करु तसेच आत्महत्या सारख्या मार्गाचा अवलंब करू नये असे आवाहन केले. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी दिलेले निवेदन वरिष्ठ स्थरावर सादर करण्यात येईल असे तहसीलदार जयराज देशमुख यांच्याकडून लेखी स्वरूपात शेतकऱ्यांना सांगण्यात आले. या निवेदनानंतर शेतकऱ्यांनी तुर्तास आत्मदहन करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. तसेच महिन्याभरात शासन दरबारी मागण्याचा पाठपुरावा झाला. नाहीतर पुन्हा आम्ही आत्मदहन करू असा इशारा शेतकरी यांनी दिला आहे.यावेळी कल्याण ग्रामीण चे आमदार राजू पाटील, संतोष केने,गणेश म्हात्रे इत्यादी उपस्थित होते.
हेही वाचा