Yunus Shaikh joins Shiv Sena : 'कैसे हराया' म्‍हणणार्‍या MIMच्या नगरसेविका सहर शेख यांच्या वडिलांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश!

शिवसेना अखिल भारतीय केबल सेनेच्या विधानसभा अध्यक्षपदी युनूस शेख यांची नियुक्ती
MIM Corporator Sahar Shaikh Father Yunus Shaikh joins Shinde Shivsena
Published on: 
Updated on: 

MIM Corporator Sahar Shaikh Father Yunus Shaikh joins Shinde Shivsena

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : महापालिका निवडणुकीच्या काळात "कैसे हराया" आणि ‘मुंब्रा हिरवा करणार’ असे जाहीर सभेत इशारा देणार्‍या मुंब्र्यातील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (MIM) पक्षाच्या नगरसेविका सहर शेख यांचे वडील युनूस शेख यांनी शिंदेंच्‍या शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना अखिल भारतीय केबल सेनेच्या विधानसभा अध्यक्षपदी त्‍यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. दरम्‍यान, सहर शेख यांचे वादग्रस्त वक्तव्य आणि आता त्यांच्या वडिलांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश या राजकीय घडामोडींकडे मुंब्र्यातील राजकीय समीकरणांच्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.

'कैसे हराया' नंतर सहर शेख आल्‍या होत्‍या चर्चेत

महापालिका निवडणुकीच्या काळात सहर शेख यांनी आपल्या भाषणातून "कैसे हराया" आणि ‘मुंब्रा हिरवा करणार’ असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून त्यावेळी राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. तसेच त्‍यांच्‍या आक्षेपार्ह भाषणाचा व्‍हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्‍हायरल झाला होता. यानंतर राज्‍यभरात एमआयएमबरोबरच नगरसेविका सहर शेख चर्चेत आल्‍या होत्‍या.

MIM Corporator Sahar Shaikh Father Yunus Shaikh joins Shinde Shivsena
Sahar Shaikh: 'कैसा हराया…' डायलॉगमुळे चर्चेत आलेल्या सहर शेख अडचणीत; नगरसेवकपद जाणार? नेमकं काय घडलं?

युनूस शेख यांच्‍या शिवसेनेतील प्रवेशाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

आता नगरसेविका सहर शेख यांचे वडील युनूस शेख यांनी शिंदेंच्‍या शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात येत असल्याचा उल्लेख नियुक्तीपत्रात करण्यात आला आहे. शिवसेना अखिल भारतीय केबल सेनेच्या विधानसभा अध्यक्षपदी त्‍यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. शिवसेनेतील प्रवेश आणि त्‍यापाठोपाठ युनूस शेख यांना तत्‍काळ पदही देण्‍यात आल्‍याने मुंब्रातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

MIM Corporator Sahar Shaikh Father Yunus Shaikh joins Shinde Shivsena
Who is Sahar Sheikh: मुंब्र्यातील MIMची नगरसेविका सहार शेख कोण आहे? वय, शिक्षण, व्यवसाय आणि संपत्ती जाणून घ्या

युनुस शेख आव्‍हाडांचे समर्थक ते कट्ट्‍र राजकीय विरोधक...

युनुस शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्‍हाड यांचे समर्थक मानले जात. महानगरपालिका निवडणुकीत त्‍यांनी सहर यांच्‍यासाठी उमेदवारी मागितली होती. मात्र त्‍यांना उमेदवारी न मिळाल्‍याने सहर शेख या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षातून निवडणूक रिंगणात उतरल्‍या होत्‍या. निवडणूक जिंकल्‍यानंतर युनुस व सहर शेख यांनी थेट जितेंद्र आव्‍हाडांवर हल्‍लाबोल केला होता. "तू माझ्या मुलीला उमेदवारी नाकारलीस, मी आता माझ्या मुलीला एमआयएममधून निवडून आणलं आहे. प्रभाग क्रमांक 30 मध्ये जर कधी फिरताना दिसला तर तुला दाखवतो," अशी थेट धमकी देत युनुस शेख यांनी जितेंद्र आव्हाड यांना आव्हान दिले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news