Pradeep Purnekar Case: ....तोपर्यंत शांत बसणार नाही; प्रदीप पूर्णेकर हत्येप्रकरणी उद्धव ठाकरेंचा इशारा; कुटुंबीयांना काय आश्वासन दिलं?

Pradeep Purnekar Case: प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येनंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
Uddhav Thackeray Pradeep Purnekar Case
Uddhav Thackeray Pradeep Purnekar Case Pudhari
Published on: 
Updated on: 

Pradeep Purnekar Case: ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी हत्येतील दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत आक्रमक भूमिका मांडली.

पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी या कठीण प्रसंगी कुटुंबाला एकटे पडू देणार नसल्याचे सांगितले. पूर्णेकर हे पक्षासाठी निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते होते. त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी शिवसेना पूर्ण ताकदीने उभी राहील, असा विश्वास त्यांनी दिला.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी हत्येतील आरोपी आणि या प्रकरणामागील सूत्रधारांवर कठोर कारवाईची मागणी केली. गुन्हेगारांना कायद्याच्या चौकटीत कठोरात कठोर शिक्षा मिळेपर्यंत आपला लढा सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. दोषींना फाशीची शिक्षा होईपर्यंत शांत बसणार नसल्याचेही त्यांनी म्हटले.

या हत्येमागे नेमके कारण काय, याबाबत सध्या विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. राजकीय वर्चस्वाचा संघर्ष, मानपाडा परिसरातील क्लस्टर योजनेशी संबंधित वाद किंवा अमली पदार्थांच्या व्यवहाराविरोधातील भूमिका यापैकी कोणता मुद्दा हत्येमागे आहे का, याचा तपास तपास यंत्रणांकडून केला जात आहे.

पूर्णेकर यांनी यापूर्वी परिसरातील अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात पोलिसांकडे कारवाईची मागणी केली होती. तसेच मानपाडा येथील क्लस्टर प्रकल्पाशी संबंधित काही प्रश्नांवरही त्यांनी भूमिका घेतली होती. त्यामुळे या सर्व बाबींचा तपासात विचार केला जावा, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून होत आहे.

Uddhav Thackeray Pradeep Purnekar Case
Pradeep Purnekar Case: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी घडामोड; 3 महिला, 2 पुरुष पोलिसांच्या ताब्यात, पप्या शिंदेशी कनेक्शन उघड

दरम्यान, पूर्णेकर यांच्या हत्येनंतर ठाकरे गटाने पोलिसांकडे आक्रमकपणे या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केली आहे. आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर तपासाला वेग आला असून काही व्यक्तींची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

Uddhav Thackeray Pradeep Purnekar Case
Mumbai Police Clash: ‘तो कोणीही असो...', मरीन ड्राइव्हवर पोलिसांशी भिडला तरुण; भररस्त्यात नेमकं काय घडलं? VIDEO व्हायरल

पूर्णेकर हत्या प्रकरणात नेमका कट कोणी रचला, हत्येमागील कारण काय आणि या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण, याचा तपास सध्या सुरु आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे या प्रकरणातील तपास आणि आरोपींवरील कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news