Vidarbha Express: विदर्भ एक्स्प्रेसमध्ये 32 लाखांची सॅक चोरी; झोपेत असलेल्या प्रवाशाला फटका

नाशिक रोड ते सीएसएमटीदरम्यान चोरी; सीसीटीव्हीच्या आधारे पश्चिम बंगालमधून सराईत चोरटा जेरबंद
Vidarbha Express
Vidarbha ExpressPudhari
Published on
Updated on

कल्याण : विदर्भ एक्स्प्रेसने प्रवास करणारे प्रवासी झोपेत असताना चोरटा त्यांची हिरव्या रंगाची सॅक चोरी करून पसार झाला. त्या सॅकमध्ये 32 लाख 73 हजार रुपयांचा ऐवज होता. त्यात रोकड आणि दागिने होते. पोलिसांनी नाशिक रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्निमन्स दरम्यानचे रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फूटेज तपासून सराईत चोरट्याला पश्चिम बंगाल येथून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव जहीर जमाल शेख (28) असे आहे.

Vidarbha Express
Kalyan East crime: कल्याण पूर्वेत दिवसाढवळ्या लोखंडी रॉडने हल्ला; आंभे बसस्टॉपजवळ भीतीचे वातावरण

विदर्भ एक्स्प्रेसने एक प्रवासी प्रवास करीत होता. त्याला प्रवासात झोप लागली. तो झोपलेला असतानाचा फायदा घेत चोरट्याने त्याची सॅक लंपास केली. पहाटे गाडीने नाशिक रोड सोडले तेव्हा प्रवाशाला जाग आली. त्याच्या लक्षात आले की, त्याची दागिने आणि रोकड असलेली सॅक ही चोरीस गेली आहे. त्याने या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली. रेल्वे गुन्हे अन्वेषण शाखेकडून या प्रकरणाचा तपास करण्यात आला.

Vidarbha Express
Fake Branded Jeans Factory Raid: उल्हासनगरमध्ये बनावट ब्रँडेड जीन्स कारखान्यावर छापा; लाखोंचा माल जप्त

दरम्यान या घटनेत चोरीस गेलेले दागिने आणि रोकड असा एकूण 32 लाख 73 हजार रुपयांचा ऐवज होता. पोलिसांनी नाशिक रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्सपर्यंत रेल्वे गाडीने जिथे जिथे थांबा घेतला. त्या रेल्वे स्थानकातील सर्व सीसीटीव्ही तपासून पुढील कारवाई केली.

Vidarbha Express
Kharegaon Flyover Thane MSRDC: खारेगाव उड्डाणपूल तीन दिवसांत सुरू; निकृष्ट कामांवर कारवाईचे शिंदेंचे आदेश

पोलिसांनी गाठले पश्चिम बंगाल

या तपासात दादर रेल्वे स्थानकात एक संशयास्पद तरुण हिरव्या रंगाची सॅक पाठीवर घेऊन उतरत असताना दिसला. पोलिसांनी त्याची माहिती काढली. तो पश्चिम बंगालचा असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पश्चिम बंगाल गाठले. त्याला पश्चिम बंगाल येथून अटक केली. त्याच्याकडून 26 लाख 88 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. हा गुन्हा रेल्वे पोलीस आयुक्त एम. कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण रेल्वे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने उघडकीस आणला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news