Kalyan East crime: कल्याण पूर्वेत दिवसाढवळ्या लोखंडी रॉडने हल्ला; आंभे बसस्टॉपजवळ भीतीचे वातावरण

जुन्या वादातून गाडी अडवून बेदम मारहाण; एक जखमी गंभीर, आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना
 लोखंडी रॉडने मारहाण
लोखंडी रॉडने मारहाणFile Photo
Published on
Updated on

नेवाळी : कल्याण पूर्वेतील श्री मलंगगड रोडवरील आंभे बसस्टॉप परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या मारहाणीच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जुन्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादींची गाडी अडवून लोखंडी रॉड व लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात अनिल भाग्यवंत याच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली असून आदित्य भाग्यवंत यालाही मारहाण झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 लोखंडी रॉडने मारहाण
Titwala GR Patil School: परीक्षेच्या तोंडावर शाळा, मुख्याध्यापकांचे कार्यालयही सील; 1.28 कोटी कर थकबाकीमुळे प्रशासनाची कठोर कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारीनुसार, धर्मा भाग्यवंत, त्यांचे लहान भाऊ व पुतण्या हे आंभे बसस्टॉप येथे आले असता पाच सहा 5-6 अनोळखी तरुणांनी त्यांची गाडी अडवली होती.

यावेळी लाकडी दांडक्याने आदित्यच्या पाठीवर मारहाण करण्यात आली, तर भंडारी याने लोखंडी रॉडने अनिल भाग्यवंत यांच्या डोक्यात वार करून त्यांना गंभीर जखमी केली आहे.

 लोखंडी रॉडने मारहाण
Ulhasnagar Crime | भांडण सोडवले म्हणून सराईत गुंडाने केला दुकानदारावर हल्ला 

या घटनेतील इतर आरोपींनीही लाकडी दांडक्यांनी मारहाण करण्यात आली तसेच यावेळी शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादींनी पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 लोखंडी रॉडने मारहाण
Fake Branded Jeans Factory Raid: उल्हासनगरमध्ये बनावट ब्रँडेड जीन्स कारखान्यावर छापा; लाखोंचा माल जप्त

कठोर कारवाईचा इशारा

या प्रकरणी उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेवाड हे करत आहेत. दरम्यान वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news