Vande Bharat Snake Incident: वंदे भारत ट्रेनमध्ये माथेफिरूने मुद्दाम सोडला साप

प्रवाशांच्या जीवाशी खेळ : मुंब्रा येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या
Vande Bharat Snake Incident
Vande Bharat Snake IncidentPudhari
Published on
Updated on

ठाणे : वेगवान आणि सुरक्षित प्रवासासाठी ओळखली जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस आता एका धक्कादायक प्रकारामुळे चर्चेत आली आहे. मुंबई-सोलापूर वंदे भारतमधील स्वच्छतागृहात डिसेंबरमध्ये अडीच फुटी साप (धामण) आढळला होता. प्रवाशांमध्ये भीती पसरवण्यासाठी हा साप सोडण्यात आला होता. हे कृत्य करणाऱ्या माथेफिरूला रेल्वे सुरक्षा दलाने मुंब्रा येथून अटक केली आहे.

Vande Bharat Snake Incident
Thane crime news | डोंबिवलीत पोलिसांचा थरारक पाठलाग; नायजेरियन ड्रग डीलरसह तिघांना ठोकल्या बेड्या, २.१५ कोटींचे अमली पदार्थ जप्त!

गाडी क्रमांक 22225 मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस सी-16 डब्यातील स्वच्छतागृहात साप दिसल्याची तक्रार प्रवाशांनी 27 डिसेंबर रोजी केली. गाडीतील रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने स्वच्छतागृह बंद केले आणि त्याची माहिती रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला देण्यात आली. कर्जत स्थानकात प्रवाशांना साप दिसल्याचे लक्षात येताच स्वच्छतागृहाची तपासणी करण्यात आली. मात्र, त्यावेळी साप आढळला नाही. त्यानंतर पुणे स्थानकात तपासल्यावरही तो सापडला नाही.

Vande Bharat Snake Incident
Thane District Annual Plan 2026-27: ठाणे जिल्ह्याच्या विकासासाठी 1700 कोटींचा भव्य आराखडा; निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री फडणवीस

अखेर सोलापूरला पोहोचल्यावर सर्पमित्राच्या मदतीने सापाला बाहेर काढण्यात आले. हा साप धामण जातीचा बिनविषारी असल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणात तपास अत्यंत चौकसपणे सुरू होता. साप वंदे भारतमध्ये कसा पोहोचला, याचा तपास सुरू करण्यासाठी गाडीतील सीसीटीव्हीची तपासणी करण्यात आली. सीसीटीव्हीमध्ये ठाणे स्थानकाच्या दरम्यान एक संशयास्पद व्यक्ती शौचालयात जाताना आणि येताना कैद झाली होती. या घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वे प्रशासनाने एक विशेष तपास पथक नियुक्त केले होते. सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयिताची ओळख पटवण्यात आली.

Vande Bharat Snake Incident
Badlapur Ulhas River: बदलापूरकरांना दिलासा? उल्हास नदी पूररेषेचे पुनर्सर्वेक्षणासाठी समिती स्थापन

अखेर 12 फेब्रवारी रोजी रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ)ने मुंब्रा परिसरातून 37 वर्षीय जगन अर्जुन भाले याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान एक्स्प्रेसमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्यासाठी साप सोडल्याची कबुली त्याने दिली आहे. याप्रकरणी रेल्वे कायद्यानुसार कलम 145(बी), 147 आणि 153 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भोलेला कल्याण येथील रेल्वे न्यायालयात हजर केले असता, त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

Vande Bharat Snake Incident
Vidarbha Express: विदर्भ एक्स्प्रेसमध्ये 32 लाखांची सॅक चोरी; झोपेत असलेल्या प्रवाशाला फटका

या कारवाईमुळे मध्य रेल्वे आरपीएफच्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही कृत्याविरुद्ध कठोर पावले उचलली जातील, असा इशारा रेल्वे अधिकाऱ्यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news