Badlapur Ulhas River: बदलापूरकरांना दिलासा? उल्हास नदी पूररेषेचे पुनर्सर्वेक्षणासाठी समिती स्थापन

उल्हास नदीच्या निळी, लाल पूररेषेचे नव्याने सर्वेक्षण
Badlapur Ulhas River
Badlapur Ulhas RiverPudhari
Published on
Updated on

बदलापूर : उल्हास नदीलगत निळी पूररेषा आणि लाल पूररेषाचे आवश्यकतेनुसार नव्याने पुर्नसर्वेक्षण करणे, पूररेषा बाधित क्षेत्रातील अधिकृत इमारतीचा सुनियोजित पुनर्विकास करणे, पूररेषा बाधित क्षेत्रातील जुन्या सोसायटीच्या पुनर्विकास प्रस्तावांमध्ये टि.डी.आर सहीत बांधकाम परवानगी मिळण्या कामी तातडीची उपाययोजना व कार्यवाही करावी यासाठी सर्व समावेशक विकास नियंत्रण नियमावली तयार करण्याकरिता समिती स्थापन करण्यात आली आहे. नगर विकास विभागाने ही कमिटी स्थापन केली असून त्यासाठी आमदार किसन कथोरे यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला आहे. ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनच्या सर्वसामावेशक धोरणाबाबत राज्याचे मुख्यमंत्री बदलापूर शहराला दिलासा देतील, असा विश्वास आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केला आहे.

Badlapur Ulhas River
Thane Coastal Road Phase: ठाणे किनारी मार्ग-1 ला वेग; 8 महिन्यांत 50% पायाभरणी पूर्ण

बदलापूरमध्ये ब्लू लाईन आणि रेड लाईन हा विषय प्रकर्षाने अडचणीचा ठरतोय अशा प्रकरणांमध्ये निळी पूररेषा आणि लाल पूररेषा यांचे नव्याने सर्वेक्षण करण्याचे दृष्टीकोनातून तसेच राज्यातील नद्यांना येणाऱ्या पुरामुळे बाधित होणारे क्षेत्र व सदर पुरामुळे होणार वित्त व जिवितहानी याबाबत देखील अभ्यास करुन सदर मुद्यांवर शासनास उपाययोजना सुचविणे, तसेच नद्यांचे लगत जागेवरील परिस्थिती, भविष्यातील विकास तसेच विकासाचा दबाव यासारख्या व इतर अनुषंगीक मुद्द्यांचा विचार करुन,

Badlapur Ulhas River
RTE Fee Reimbursement: आरटीई शुल्क प्रतिपूर्ती वाढणार कधी? शाळा संस्थाचालकांचा सवाल

नदीपात्रालगतच्या दाटवस्ती, पूर बाधित क्षेत्रातील नागरिक व अधिकृत इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाश्यांकरिता पुनर्विकास प्रस्तावामध्ये व निषिध्द क्षेत्रामध्ये विद्यमान अधिकृत इमारतीचा पुनर्विकास करण्याकामी अशा विद्यमान इमारतीवर अतिरिक्त टि.डी. आर अनुज्ञेय करण्याबाबत विचार होऊन नियमावलीमध्ये बदल करणे आवश्यक असल्यास त्याबाबत समीतीने शासनास आवश्यक ते प्रस्तावित बदल व उपाययोजना सुचविण्यासाठी नेमली असून या माध्यमातून बदलापूर शहराला मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केला आहे.

Badlapur Ulhas River
CET 2026 Aadhaar authentication: सीईटी 2026 नोंदणीत आधार सक्तीवर यू-टर्न; विद्यार्थ्यांना अखेर दिलासा

कुळगाव बदलापूर नगर परिषदेत भाजपची सत्ता आल्यानंतर नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांच्यासह बदलापुरातील नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती तेव्हा हा विषय तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार या कमिटीची स्थापना केल्यानंतर बदलापूर शहरात अस्ताव्यस्त पसरलेल्या पूर्ण नियंत्रण रेषेध बाबत मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेऊन बदलापूरकरांना दिलासा देतील, असा विश्वासही रुचिता घोरपडे यांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news