

डोंबिवली : दोघा अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या विकृताला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अरूण उत्तप्पा (२८) असे अटक करण्यात आलेल्या विकृताचे नाव आहे. या विकृताच्या अत्याचाराला बळी पडलेली दोन्ही मुले मुंबईतील वडाळा परिसरात राहणारी आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून हा विकृत त्यांच्यावर अत्याचार करत होता. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीसह हा गुन्हा वडाळा लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केला आहे.
लैंगिक अत्याचार करण्यासाठी अरूण उत्तप्पा याने या दोन्ही मुलांना कल्याणमध्ये आणले होते. मात्र रेल्वे स्टेशनवर या तिघांना पाहून गस्तीवरील पोलिसांच्या पथकाला संशय आला. पोलिसांनी अरूणसह दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला. लिपस्टिक आणि जेलचा वापर करून हा विकृत त्यांच्यावर अत्याचार करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील चौकशीसाठी या विकृताला वडाळा लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
रविवारी संध्याकाळच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकात फलाटावर संशयास्पदरित्या घुटमळणाऱ्या तिघांना गस्तीवरील पोलिसांनी ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरी कांदे यांनी या मुलांची आस्थेवाईकपणे चौकशी केली असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही दोन्ही मुले ११ वयोगटातील असून त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार करणारा आरोपी अरूण उत्तप्पा हा २८ वर्षाचा आहे. चौकशीदरम्यान त्याने परिसरात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना फिरण्याच्या निमित्ताने फुस लावून बाहेर आणले. या विकृतीच्या विरोधात लहान मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आणि अत्याचारग्रस्त मुले असे तिघेही मुंबईतील वडाळा परिसरात राहत असल्याने हा गुन्हा वडाळा पोलिसाकडे वर्ग केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांनी सांगितले.