Ulhasnagar Crime : दारूला पैसे दिले नाही म्हणून पत्नीची जिवंत जाळून हत्या

पतीला जन्मठेप आणि १० हजारांच्या दंडाची शिक्षा
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

उल्हासनगर : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळल्याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल खुनाच्या गंभीर गुन्ह्यात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कल्याण येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी महानसिंग ऊर्फ रॉबिन मानसिंग थापा याला जन्मठेपेसह १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली असून, दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मयत महिला आणि आरोपी हे नात्याने पती-पत्नी असून, उल्हासनगरातील सतनाम साकी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी परिसरात ते वास्तव्यास होते. दोघेही राहत असलेल्या इमारतीत वॉचमनचे काम करीत होते. आरोपीला दारू पिण्याचे व्यसन असल्याचे तपासात समोर आले होते.

Crime News
Mumbai extortion case : वांद्र्यात पुनर्विकास सुरू ठेवण्यासाठी मागितली ११ कोटींची खंडणी; २५ लाख घेताना ५ अटकेत

१५ जुलै २०१३ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आरोपी महानसिंग थापा याने दारू पिण्यासाठी पत्नींकडे पैसे मागितले. मात्र, पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या आरोपीने घरातील रॉकेलच्या कॅनमधील रॉकेल पत्नीच्या अंगावर ओतले आणि माचीसची काडी पेटवून तिला आग लावली. या घटनेत महिला सुमारे ९० टक्के भाजून गंभीर जखमी झाली होती. उपचारासाठी तिला मध्यवर्ती रुग्णालय, उल्हासनगर येथे दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

या घटनेत आरोपीदेखील भाजून जखमी झाला होता. या गंभीर गुन्ह्याचा तपास तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक अ. प्र. मोकाशी यांनी करून आरोपीविरुद्ध कल्याण येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात मुदतीत दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्याच्या सुनावणीदरम्यान फिर्यादी, साक्षीदार, पंच आणि तपास अधिकारी यांच्या साक्षी व सादर केलेल्या सबळ पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले.

Crime News
Thane water diversion : ठाणे तहानलेले अन् पाणी गोदावरीला!

दोन दिवसांपूर्वी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, कल्याण येथील न्यायाधीश ताम्हणेकर यांनी आरोपी महानसिंग ऊर्फ रॉबिन मानसिंग थापा याला जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीला तीन महिने सश्रम कारावास भोगावा लागणार आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता सचिन कुलकर्णी आणि खंडागळे यांनी बाजू मांडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news