Ulhas River Pollution: उल्हास नदी प्रदूषणमुक्तीसाठी केडीएमसीपुढे दोन पर्याय

मोहने-गाळेगाव नाला वळविण्यासाठी 6.47 कोटी ते 16.41 कोटी खर्चाचा अंदाज
Ulhas River Pollution
Ulhas River PollutionPudhari
Published on
Updated on

डोंबिवली: उल्हास नदीत मिसळणारे मोहने आणि गाळेगाव नाल्यातील सांडपाणी रोखण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने दोन पर्यायांचा अभ्यास केला आहे. या दोन्ही पर्यायांचा तपशील आणि खर्चाचा अंदाज महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाचे उपअभियंता शितलकुमार कापसे यांनी तयार केलेल्या अहवालात नमूद केला आहे.

उल्हास नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर असून मोहने व गाळेगाव नाल्याचे पाणी थेट नदीत मिसळत आहे. हा प्रकल्प मार्गी लागल्यास उल्हास नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषणमुक्त होण्यास मदत होणार आहे.

Ulhas River Pollution
Dombivli MIDC Electricity Theft: डोंबिवलीत नाल्याच्या कामासाठी विजेची चोरी

उल्हास नदीचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मोहने आणि गाळेगाव भागातून येणाऱ्या नाल्याचे सांडपाणी थेट उल्हास नदीत मिसळत असल्याने नदी प्रदूषित होत असे.

हे रोखण्यासाठी केडीएमसीकडून सदर नाले वळविण्याच्या कामासाठी 6 कोटी 47 लाख रूपये खर्चाचा प्रस्ताव तयार केला असून 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सादर केलेल्या 3,186 कोटी 60 लाख रूपयांच्या अंदाजपत्रकात या कामाचा समावेश करण्यात आसल्याने हे काम लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत.

मोहने आणि गाळेगाव नाल्यावर इनलाईन पंपिंग स्टेशन उभारून तेथील सांडपाणी अंबिवली येथील अस्तित्वात असलेल्या 21 एमएलडी क्षमतेच्या मलशुद्धीकरण केंद्रात वळवण्यात येणार आहे. यासाठी एकूण 6 कोटी 47 लाख 14 हजार 105 रूपये खर्च अपेक्षित आहे.

यामध्ये गाळेगाव नाल्यासाठी 3 कोटी 69 लाख 78 हजार 819 रुपये आणि मोहने नाल्यासाठी 2 कोटी 77 लाख 35 हजार 286 रूपये खर्च येईल. या कामात नाला इंटरसेप्शनची सिव्हिल कामे, रायझिंग मेन टाकणे, इलेक्ट्रो मेकॅनिकल कामे, इलेक्ट्रिक कनेक्शन, 3 टक्के आकस्मिक खर्च आणि 18 टक्के जीएसटीचा समावेश आहे.

Ulhas River Pollution
Mumbai APMC Inquiry Order: मुंबई APMCवर मोठी चौकशी; 5 वर्षांच्या कामकाजावर 20 मुद्द्यांवर तपासाचे आदेश

मोहने आणि गाळेगाव नाल्यावर इनलाईन पंपिंग करण्यासोबतच गोदरेज रिव्हेरिया येथे 5 एमएलडी क्षमतेचे एसबीआर तंत्रज्ञानावर आधारित नवे मलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी एकूण 16 कोटी 41 लाख 33 हजार 105 रुपये खर्च अपेक्षित आहे.

या खर्चात इनलाईन पंपिंगसाठी 6 कोटी 47 लाख 14 हजार 105 रुपये, नव्या एसटीपीसाठी 3 कोटी 37 लाख 20 हजार रूपये, गाळेगाव नाल्यापासून गोदरेज रिव्हेरियापर्यंत 250 मिमी व्यासाची 2.9 किमी लांबीची डीआय रायझिंग मेन टाकण्यासाठी 2 कोटी 34 लाख 90 हजार रूपये, मोहने नाल्यापासून 400 मिमी व्यासाची 3.0 किमी लांबीची लाईन टाकण्यासाठी 3 कोटी 72 लाख 9 हजार रूपये आणि वडवली रेल्वे ट्रॅक ओलांडण्यासाठी मायक्रो टनेलिंगच्या कामासाठी 50 लाख रूपयांचा समावेश आहे.

केडीएमसीपुढे पेच

केडीएमसीच्या 2026-27 च्या अंदाजपत्रकात 6 कोटी 47 लाख रूपयांच्या खर्चाच्या पर्याय अ चा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. अस्तित्वात असलेल्या आंबिवली एसटीपीचा वापर केल्यास खर्च कमी होऊन काम जलद होईल.

मात्र भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता गोदरेज रिव्हेरिया येथे नवे एसटीपी उभारणे दूरगामी फायद्याचे ठरू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे प्रशासनापुढे स्वस्त पर्याय निवडायचा की महागडा ? पण भविष्यातील गरज भागवणारा पर्याय निवडायचा, असा पेच निर्माण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news