illegal debris dumping : डेब्रिज टाकणाऱ्यांना दणका; 3 वाहने जप्त

7 जणांवर गुन्हे दाखल
illegal debris dumping
illegal debris dumpingpudhari photo
Published on
Updated on

मिरा रोड : मिरा भाईंदर शहरात गेल्या काही महिन्यापासून रस्त्यावर अवैधरीत्या बांधकाम टाकाऊ साहित्य, माती, डेब्रीज टाकले जाते. त्यामुळे वाहतूक कोंडी व अपघात होण्याचा धोका निर्माण होत आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील काशिमीरा परिसरात अवैध डेब्रिज टाकणाऱ्या तीन वाहनांवर महापालिकेने कारवाई करत वाहने जप्त केली असून चालक, मालक व कर्मचारी अशा 7 जणांवर काशीगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मिरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील मिरा ते चेना विभागामार्फत 7 एप्रिल रोजी अवैद्यरित्या डेब्रिज / माती राडारोडा टाकल्याबाबत स्वच्छता निरीक्षक कांतीलाल बांगर यांच्यामार्फत दंडात्मक कारवाई करुन वाहन क्रमांक एमएच 04 जेयू 5442 , एमएच 46 बीएम 7316 व एमएच 48 डीसी 1686 ही वाहने जप्त करण्यात आली असुन 7 वाहन चालक मालक व मजूर यांच्यावर काशीगाव पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

illegal debris dumping
Indapur Holi Traffic Jam: होळीपूर्वी इंदापूरमध्ये वाहतूक कोंडीची शक्यता; मुंबई-गोवा महामार्गावरील रखडलेले काम कारणीभूत

आपल्या घरातील दुरूस्तीचे तसचे इमारती व सोसायटी तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी बांधकाम टाकाऊ साहित्य, माती, डेब्रीज इतरत्र टाकण्यात येऊ नये अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल तसेच याबाबत गुन्हा दाखल करण्यात येईल असे उपायुक्त डॉ. सचिन बांगर यांनी आवाहन केले आहे.

illegal debris dumping
Nashik Unseasonal Rain | नाशिकमध्ये अवकाळी तांडव; पूल तुंबले, रस्त्यांत चिखल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news