Thousands of fish die in Ulhas River| उल्हास नदीत विषारी पाण्याने हजारो माशांचा मृत्यू

उल्हास नदीत विषारी पाण्याने हजारो माशांचा मृत्यू
Ulhas River Pollution
Ulhas River PollutionPudhari
Published on: 
Updated on: 

डोंबिवली : ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या उल्हास नदीला प्रदूषणाचा विळखा पडला असून, जांभूळ गावाजवळ नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर मृत माशांचा खच पडल्याचे दिसून आले आहे. रासायनिक सांडपाण्यामुळे हा भयंकर प्रकार घडल्याचा संशय व्यक्त होत असून, या जलप्रदूषणामुळे केवळ आदिवासी बांधवांच्या मासेमारीवरच गदा आली नाही, तर संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या आरोग्यालाही मोठा धोका निर्माण झाला आहे.

सकाळी मासेमारीसाठी नदीवर गेलेल्या स्थानिक मच्छीमारांना नदीचे पाणी नेहमीसारखे न दिसता वेगळ्याच रंगाचे आणि दुर्गंधी येणारे दिसले. कर्जतपासून निघणारी आणि बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली मार्गे ठाण्यापर्यंत वाहणारी ही उल्हास नदी म्हणजे ठाणे जिल्ह्यातील सात महानगरपालिकांमधील जवळपास एक कोटी नागरिकांची जीवनवाहिनी आहे.

याच नदीचे पाणी जांभूळ येथील जलशुद्धीकरण केंद्रात उचलून प्रक्रिया करून लाखो घरांमध्ये पिण्यासाठी पाठवले जाते. पण ज्या जांभूळ परिसरात हे मासे मरून पडले आहेत. त्याच ठिकाणाहून पाणी उचलले जात असल्याने आता लाखो नागरिकांच्या आरोग्यावर थेट घाला घातला गेला आहे का? असा संतप्त सवाल सर्वत्र विचारला जात आहे.

औद्योगिक वसाहतींमधून रात्रीच्या अंधारात सोडले जाणारे रासायनिक आणि विषारी पाणी हेच या सामूहिक माशांच्या मृत्यूमागचे खरे कारण असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. कारण त्या विषारी पाण्यामुळे नदीतील विरघळलेला ऑक्सिजन म्हणजेच डिसॉल्व्हड ऑक्सिजन कमालीचा खाली गेला आहे.

Ulhas River Pollution
Dombivli News : डोंबिवली-दिव्यातून थेट मुंबईसाठी लोकल सोडा : रवींद्र चव्हाणांची मध्य रेल्वे प्रशासनाकडे आग्रही मागणी

दोषी कंपन्यांवर कठोर कारवाईची मागणी

या पार्श्वभूमीवर नदीकाठावरील मृत मासे उचलू नका, खाऊ नका, बाजारात विकूही नका. कारण ते विषारी असू शकतात आणि त्यामुळे गंभीर आजार होऊ शकतो. नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. एक कोटी लोकांची तहान भागवणाऱ्या या नदीला विषारी करणाऱ्या दोषी कंपन्यांवर प्रशासन कधी कारवाई करणार व उल्हास नदी पुन्हा कधी होणार? याकडे लक्ष लागले आहे.

Ulhas River Pollution
KDMC News | थकबाकीपोटी कॅनरा बँकेचे एटीएम सील; कल्याण-डोंबिवली महापालिकेची कारवाई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.