KDMC News | थकबाकीपोटी कॅनरा बँकेचे एटीएम सील; कल्याण-डोंबिवली महापालिकेची कारवाई

४८ लाखांच्या थकबाकीसाठी केडीएमसीची कारवाई
KDMC Canara Bank ATM Sealed
KDMC Canara Bank ATM SealedPudhari
Published on: 
Updated on: 

KDMC Canara Bank ATM Sealed

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने मालमत्ता कर थकवणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेत धडक कारवाईला सुरुवात केली आहे. तब्बल ४८ लाख रुपयांच्या थकबाकीपोटी फ प्रभाग क्षेत्राअंतर्गत डोंबिवली पूर्वेतील कॅनरा बँकेचे एटीएम सील करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका कल्याण ६ / फ प्रभाग क्षेत्र कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली. मालमत्ता कर हा महापालिका उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. आयुक्त अभिनव गोयल यांनी कर विभागास वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. त्यानुसार ६ / फ प्रभाग क्षेत्रा अंतर्गत थकित मालमत्ता करधारकांवर वसुलीकामी कारवाई सुरू करण्यात आली आहे, फ प्रभाग क्षेत्र हद्दीतील डोंबिवली पूर्व येथील पाटकर चॅरिटेबल ट्रस्ट या इमारतीमधील कॅनरा बँकेचे थकबाकीपोटी एकूण ४८ लाख १२ हजार ८७७ इतकी येणे बाकी आहे.

KDMC Canara Bank ATM Sealed
KDMC City Engineer Appointment: सेवाज्येष्ठता डावलून महत्त्वाच्या पदांवर ‘मर्जीतील’ अधिकाऱ्यांना संधी; नियुक्तीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

बँकेस कराची थकित रक्कम भरण्याबाबत दोन वेळा पत्राद्वारे कळविण्यात आले होते. तसेच बँकेच्या शाखा प्रबंधकांची भेट घेऊन कराचा भरणा करण्याबाबत वेळोवेळी कळवून देखील त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. ही बाब मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त बाळासाहेब चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी दिलेल्या निर्देशांनुसार शुक्रवारी मालमत्ता कराच्या थकबाकीपोटी कॅनरा बँकेचे एटीएम सील करण्यात आले.

ही कारवाई सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांच्या नियंत्रणाखाली कर अधीक्षक सर्फराज तडवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. तसेच यापुढेही ६/ फ प्रभागातील मालमत्ता कर न भरणाऱ्या इतर बँकांवर सुद्धा अशीच कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा कर निर्धारण आणि संकलन विभागाचे उपायुक्त बाळासाहेब चव्हाण यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news