Badlapur Rape Case : आरोपी संचालकांना न्यायलयाने सुनावली पोलीस कोठडी

एका गुन्हामध्ये जामीन तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये पोलिस कोठडी
The court remanded the accused directors in Badlapur case to police custody
बदलापूर प्रकरणातील आरोपी संचालकांना न्यायलयाने सुनावली पोलीस कोठडी Pudhari File Photo
Published on
Updated on

कल्याण : बदलापूर येथे शाळकरी मुलीवर अत्याचार प्रकरणातील माहिती दडपणारे शाळेचे संचालक तुषार आपटे व उदय कोतवाल या दोघांना ठाणे गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली होती. यानंतर त्यांना गुरुवारी (दि.3) कल्याण न्यायलायासमोर हजार केले होते. यावेळी न्यायालयाने दोघा आरोपींना एका गुन्ह्यात जामीन दिला तर दुसऱ्या गुन्ह्यात तपासासाठी पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन शुक्रवारी (दि.4) या गुन्ह्यात त्यांना न्यायालया समोर हजार केले जाणार आहे. पहिल्या गुह्यात जामीन झाला असला तरी दुसऱ्या गुन्ह्यात त्यांना पोलीस कोठडी सुनावल्याने दोन्हीं आरोपीची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

The court remanded the accused directors in Badlapur case to police custody
बदलापूर प्रकरणातील शाळेचे ट्रस्टी तुषार आपटे, उदय कोतवाल यांना अटक

बदलापूरमधील दोन चिमुरडीवर नराधम अक्षय शिंदे याने अत्याचार केला होता. या घटनेची माहिती असूनही तुषार आपटे व उदय कोतवाल या दोघा शाळेच्या संचालकांनी दडवून ठेवत्याची माहिती उजेडात येताच दोघा संचालकानी पळ काढीत गेल्या दीड महिन्या पासून फरार झाले होते. दरम्यान या दोघा फरार संचालकांनी न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायलयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता. या दोघा फरार आरोपीचा पोलीस कसून तपास करीत होते अखेरीस ठाणे गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी बुधवारी रात्री दोघा फरार संचालक आरोपींना अटक करीत दोन वेगवेगळ्या गुन्ह्याच्या तपासासाठी गुरुवारी दुपारी दोघांना कल्याण कल्याणात हजर केले असता न्यायालयाने त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे हे जामीनपात्र असल्याचा निर्वाळा दिला आहे. यासाठी यापूर्वी दाखल असलेल्या ६ गुन्ह्याचा तपशील आरोपीच्या वतीने वकील चंद्रकात सोनवणे यांनी न्यायालयासमोर मांडला.

या सर्व गुन्ह्यात आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आल्याने हे दोन्ही आरोपी जामिनास पात्र असल्याचे सोनवणे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यानंतर जिल्हा न्यायाधीश पी.पी मुळे यांनी या दोन्ही आरोपीना १७ ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावताच आरोपीच्या वतीने सोनवणे यांनी जामीनासाठीचा अर्ज न्यायालयासमोर सादर केला असता न्यायालयाने त्यांची २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर सुटका केली. तर सरकारी पक्षाच्या वतीने बाजू मांडणाऱ्या वकील अश्विनी भामरे पाटील यांनी या दोन्ही संचालकानी पदाचा गैरवापर करत आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यामुळेच पुढे इतक्या मोठ्या घडामोडी घडल्याचे तसेच पोलिसांना या प्रकरणातील सीसीटीव्हीचे फुटेज आणि डिव्हीआर प्राप्त करायचे असल्याने या दोन्ही आरोपीना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती.

The court remanded the accused directors in Badlapur case to police custody
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर

दरम्यान आरोपीची जामिनावर सुटका केल्यानंतर भामरे पाटील यांची आरोपीवर दोन गुन्हे दाखल असल्याने पहिल्या गुन्ह्यात त्यांची जामिनावर सुटका झाली असली तरी दुसऱ्या गुन्ह्यात त्याना पोलीस कस्टडी देण्याची मागणी न्यायालयाने ग्राह्य धरली यामुळे या दोन्ही आरोपीना जामीन मिळाल्यानंतर ही त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news