बदलापूर प्रकरणातील शाळेचे ट्रस्टी तुषार आपटे, उदय कोतवाल यांना अटक

Badlapur Sexual Assault : बदलापूर घटनेच्या दीड महिन्यानंतर दोघे ताब्यात
Badlapur Sexual Assault
बदलापूर प्रकरणातील शाळेचे ट्रस्टी पोलिसांच्या ताब्यातFile Photo
Published on
Updated on

बदलापूर : बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे यांचा पोलिसांकडून करण्यात आला. त्यानंतर या प्रकरणातील सहआरोपी शाळेचे ट्रस्टी तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांना आज (दि.२) रात्री अटक करण्यात आली. बदलापूर घटनेच्या दीड महिन्यानंतर ठाणे क्राइम ब्रांचने दोघांना ताब्यात घेतले. दोघांना पुढील चौकशीसाठी एसआयटी टीमकडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

Badlapur Sexual Assault
Badlapur sexual assault | बदलापूरच्या शाळेचे दोन विश्वस्त फरार घोषित!

बदलापूरमध्ये दोन चिमुरडींवर अक्षय शिंदे याने अत्याचार केला होता. या घटनेची माहिती असूनही हे प्रकरण शाळेचे ट्रस्टी तुषार आपटे आणि उदय कोतवाल या दोघांनी दडपण्याचे काम केले होते. याची माहिती समोर आल्यानंतर दोघेही फरार होते. त्यांच्यावर बदलापुरातील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या घटनेच्या दीड महिन्यानंतर दोघांना ठाणे क्राइम ब्रांचने अटक केली.

उच्च न्यायालयाने पोलिसांना संस्थेच्या विश्वस्तांना का अटक केली नाही, असा सवाल मंगळवारी केला होता. त्यानंतर पुढील २४ तासांत पोलिसांनी आरापींना बेड्या ठोकल्या. बदलापूरमधील शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्यानंतर पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही म्हणून जोरदार आंदोलन झाले होते. दरम्यानच्या काळात न्यायालयाने या दोन्ही सहआरोपींचे जामीन अर्ज फेटाळले होते. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील बड्या आरोपींना वाचवले जात आहे, फरारी संस्थाचालकांना अद्याप अटक केली जात नाही, असा आरोप मृत अक्षय शिंदेच्या वकिलांनी केला होता.

Badlapur Sexual Assault
Sexual Assault | कोलकाता, बदलापूर...रोज नवे नाव! हे थांबणार कधी?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news