पुढारी ऑनलाईन डेस्क : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला आहे. आज (दि. 23) बदलापूर पोलिसांचे पथक त्याचा ताबा घेऊन पोलिस ठाण्याकडे जात होते. या यादरम्यान आरोपी अक्षयने पोलिसाकडची बंदूक अचानक हिसाकावून घेत गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी इतर पोलिसांनी त्याच्यावर स्वसंरक्षणार्थ अक्षयवर गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारात अक्षय गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
अक्षय शिंदे याने पोलिसांवर देखील गोळीबार केल्याची माहिती आहे. तळोजा कारागृहातून साडेपाच वाजता त्याला घेऊन बदलापूरला जात असताना ही घटना घडली आहे. पोलिसांची बंदूक हिसकावून घेत त्याने पोलिसांवर तीन राऊंड फायर केले.