Forest Department Thane
ठाणे : 'आपले पृथ्वी, आपले भविष्य' या घोषवाक्याला अनुसरून संपूर्ण देशात आणि राज्यात जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर विभागात आणि ठाणे परिसरात वन विभागाच्या वतीने वृक्षारोपण, बाइक रॅली व जनजागृती मोहिमांचे आयोजन करण्यात आले.
प्रदूषण रोखण्यासाठी, जैवविविधतेचा समतोल राखण्यासाठी व भविष्यासाठी हरित झोन तयार करण्याच्या वनसंरक्षक तथा संचालक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अनिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपाखाडी आणि घोडबंदर, वन विभागाच्या नागला परिमंडळात मौजे ससुपाडा आणि ससूनवघर येथेही वृक्षारोपणाचे कार्यक्रम पार पडले. त्याचबरोबर परिसरात कचरामुक्ती आणि पाणीसंधारणाबाबत माहिती देण्यात आली. यावेळी उपसंचालक (उत्तर) प्रदीप पाटील, सहायक वनसंरक्षक करिष्मा कवाडे, व वन परिक्षेत्र अधिकारी राजश्री साळवे, स्थानिक नागरिक, महिला बचतगट, विद्यार्थी, पर्यावरण प्रेमी संस्था व स्वयंसेवकांनी यात उत्साहाने भाग घेतला.
या कार्यक्रमांमधून वन 66 विभागाने नागरिकांमध्ये पर्यावरण रक्षणाबाबत सजगता निर्माण केली, आज आपण पर्यावरणासाठी काही भरीव पावले उचलण्याची गरज आहे. वृक्षारोपण ही केवळ प्रतीकात्मक कृती नसून भविष्यासाठी गुंतवणूक आहे.
प्रदीप पाटील, उपसंचालक (उत्तर) येऊर वन विभाग