Thane News : घोडबंदर गावात बनावट नोटा छापण्याचा कारखाना

दोघांना अटक करून एक लाखाच्या बनावट नोटा जप्त
Thane News
Thane News : घोडबंदर गावात बनावट नोटा छापण्याचा कारखानाFile Photo
Published on
Updated on

Fake currency notes printing factory in Ghodbunder village

मिरा रोड : पुढारी वृत्तसेवा

काशीगाव पोलीस ठाणे हद्दीतील घोडबंदर गावात राहणारे दोन इसम हे बनावट नोटा छापण्याचा कारखाना चालवत असल्याचे आढळून आले आहे. भारतीय चलनाच्या ५०० रुपयांच्या बनावट नोटा बनवून त्या नोटा चलनात वापरताना दोन आरोपींना काशिगांव पोलीसांनी अटक केली आहे. आरोपीकडून १,०८,००० रुपये किंमतीच्या ५०० रूपये दराच्या एकुण २१६ बनावट नोटा पोलीसांनी जप्त केल्या आहेत.

Thane News
Thane News : मनपा निवडणुका स्वबळाचा निर्णय फडणवीस घेणार

मिरा रोड पूर्वेच्या जे.पी नॉर्थ रोड, विनय नगर येथे दोन इसम हे भारतीय चलनातील ५०० रुपये दराच्या बनावट नोटा कूठेतरी अज्ञात ठिकाणी छापुन त्याचा चलनात वापर करण्यासाठी येणार असल्याची माहीती काशिगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत लांडे यांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने त्या इसमांना ताब्यात घेवुन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सुचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तोगरवाड यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या, त्या प्रमाणे त्या ठिकाणी सायंकाळच्या सोमवारी सुमारास सापळा रचुन दोन इसमांना ताब्यात घेतले. त्यांची नांवे सूपर्ना रामक्रिष्णा मन्ना (२४) मुळ पत्ता पोस्ट. शामपुर प्रशमपुर नि. हुबळी पश्चीम बंगाल व सूयदिव गोपीनाथ गायेन (२०), दोघेही रा.ठि. रूम नं.०३ तरे चाळ सुर्यदेव गार्डन स्मशानभूमी रोड घोडबंदर गाव मुळ पत्ता, विष्णुबाटी, पोस्ट भाटा, जि. हुबली, पश्चिम बंगाल असे असल्याचे सांगितले. त्यांना ताब्यात घेवून त्यांची अंग झडती घेतली असता त्यांच्याकडून ५०० रुपये दराच्या २६ बनावट नोटा मिळुन आल्या आहेत.

Thane News
Thane News : महापालिका कचरा शून्य अभियानाला हरताळ

दोन्ही इसमा विरुद्ध काशीगांव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीना गुन्ह्यात अटक करुण त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी या नोटा त्यांच्या राहत्या घरात छापल्या असल्याचे सांगितले. त्यावेळी रुमची झडती घेतली असता अटक आरोपीच्या रुममध्ये ५०० रुपये दराच्या भारतीय चलनाच्या एकुण १९० बनावट नोटा मिळून आल्या आहे. तसेच बनावट नोटा छापण्यासाठी वापरलेले एच.पी. कंपनीचे कलर झेरॉक्स प्रिंटर, ए-४ साईझचे प्लेन कागदी रिम, एक चार इंचाचा चाकु, स्कुल पेंड व प्लॅस्टीकची फुटपट्टी इत्यादी साहित्य त्यांच्या घरातुन जप्त करण्यात आले आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने ८ जूनपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिली असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक राणा परदेशी हे करत आहे.

बनावट चलन कोणी इसम वितरणात आणत असल्यास त्या बाबतची माहिती नजीकच्या पोलीस ठाणेला देण्यात यावी, असे मिरा भाईंदर वसई विरार मधील नागरीकांना पोलीसांनी आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news