Thane Women Bike Rally: गुढीपाडव्यानिमित्त ठाण्यात महिलांची भव्य बाईक रॅली; 15 मार्चला ‘स्त्री शक्ती’चा जल्लोष

दै. पुढारी व कस्तुरी क्लबचा उपक्रम; पारंपरिक वेशात महिला देणार सक्षमीकरणाचा संदेश
Thane Women Bike Rally
Thane Women Bike RallyPudhari
Published on
Updated on

ठाणे : गेल्या वर्षी ठाणे आणि मुंबईतील रणरागिणींनी दिलेल्या भव्य प्रतिसादानंतर यंदाही दै. पुढारी आणि कस्तुरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाडव्यानिमित्त रविवार 15 मार्च रोजी ठाण्यात महिलांसाठी भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ढोलताशांचा गजर, डोक्यावर भगवे फेटे परिधान करून बाईकवर स्वार झालेल्या महिला, असा शानदार सोहळा रविवारी सकाळी 6.30 पासून रंगणार आहे.

Thane Women Bike Rally
Maharashtra Heatwave: मुंबईसह राज्यात उष्णतेची लाट; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

केवळ ठाणेच नव्हे तर कोल्हापूर, सांगली, पुणे अशा चार जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी महिला बाईक रॅली काढण्यात येणार आहे. रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या महिला स्वतः महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यात येणार असून या महिला बाईक रॅलीमध्ये सन मराठीच्या तू अनोळखी तरी सोबती या मालिकेमधील योगिता चव्हाण (अर्पिता), अंबर गणपुले (समीर) हे दोन कलाकार सहभागी होणार असून दै. पुढारी माध्यम समूहाच्या रॅलीमध्ये बक्षिसांची लयलूट होणार आहे. गिफ्ट हे 100% आहे, यात कोणतीही छुपी अट नाही. बाईक रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला 200 रूपयांचे गिफ्ट मिळेल, तसेच लकी ड्रॉ द्वारे 5 भाग्यवान महिलांना कलाकेंद्रातर्फे 3000 रूपयांचे गिफ्ट देण्यात येईल. हे कलाकेंद्राच्या मुंबई ठाण्यातील कोणत्याही दुकानातून आपण करू शकता. तेव्हा आजच आपल्या नावाची नोंदणी करा!

Thane Women Bike Rally
Gas Shortage Hotels Impact: गॅस टंचाईचा हॉटेल व्यवसायाला फटका; मुंबईतील 20% हॉटेल्स बंद

असा आहे बाईक रॅलीचा मार्ग

दै. पुढारीच्या वतीने वर्षभर महिलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. महिला सक्षमीकरणासाठी पुढारीने नेहमीच पुढाकार घेतला आहे. या रॅलीत सहभागी होऊन महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी महिला भगिनीही आतुर झाल्या आहेत. ठाण्यातील टीप - टॉप प्लाझा येथून रॅलीला सुरुवात होणार असून पुढे देवदया नगर, पोखरण रोड नंबर -2, बेथनी हॉस्पीटल, समता नगर, कॅडबरी जंक्शन मार्गे पुन्हा टीप - टॉप प्लाझा येथे या रॅलीचा समारोप होणार आहे. रॅलीत सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र यावेळी दिले जाणार आहे.

आत्मसन्मानाचा संदेश देणारी महिलांच्या बाईक रॅलीसाठी प्रवेश विनामूल्य आहे.

सहभागी महिलांना प्रमाणपत्र.

Thane Women Bike Rally
Maharashtra Auto Rickshaw Permit: नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना तात्पुरती स्थगिती; बाईक-टॅक्सी कंपन्यांचे परवानेही रद्द

अल्पोपाहाराची सुविधा

ड्रेस कोड - पारंपरिक वेशभूषा, नऊवारी साडी, सफेद कुर्ता-जीन्स. सर्व महिलांना पुढारीतर्फे आकर्षक फेटा बांधण्यात येईल.

शहरातील महिला, महिलांच्या संस्था आपल्या मैत्रिणींच्या ग्रुप सोबत सहभागी होऊ शकतात. रॅलीत नावीन्यपूर्ण, आकर्षक वेशभूषा परिधान करून सहभागी होणाऱ्या महिलांना व त्यांच्या ग्रुपचा सन्मान केला जाणार आहे.

रॅलीत सहभागी होण्यासाठी क्यू आर कोड स्कॅन करा. आधिक माहितीसाठी संपर्क : 9892622624, 9270256357

नाव नोंदणीसाठी लिंक : https://forms.gle/MyG5Hpm5AZTqGmqM9

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news